हरित जामखेड साठी नगरपरिषदेमार्फत एक व्यक्ती एक झाड उपक्रम

0
190
जामखेड प्रतिनिधी
           जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
  स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड व हरित जामखेड साठी आमदार रोहित पवार व त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांनी जामखेड करांना साद घातली आणी अनेक राजकीय व सामाजिक व्यक्ती व संस्था पुढे येऊन स्वच्छता लोकचळवळ बनवली आणी आता जामखेड नगरपरिषदही
वटपौर्णिमेपासून एक व्यक्ती एक झाड या मोहिमेचा शुभारंभ करत आहे या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
   जामखेड नगरपरिषदे मार्फत एक व्यक्ती एक झाड मोहिमेचा शुभारंभ दि. २४ पासून आयटीआय काॅलेज परिसरातील सुमारे १८ एकर जागेत होत आहे. या परिसरात सुमारे तीन हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या वृक्षांचे संगोपन आयटीआय येथिल विद्यार्थी व शिक्षक करणार आहेत.
   त्याचप्रमाणे लोकसहभाग घेऊन, सामाजिक संस्था यांचेमार्फतही शहरात विविध प्रभागात, मोकळ्या जागा व रस्त्यांच्या बाजूला वृक्षारोपणचे नियोजन केलेले आहे. अशी माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी जामखेड न्युजशी बोलताना दिली.
               सामाजिक कार्यकर्ते व सावळेश्वर उद्योग समूहाचे नेते रमेश आजबे यांनी प्रभाग वीस व प्रभाग क्रमांक पाचमध्ये स्वच्छता हि लोकचळवळ बनवली व दोन्ही प्रभागासह शहरात मोठय़ा प्रमाणावर वृक्षारोपण करून भर उन्हाळ्यात टॅंकरने पाणी घालून झाडे जगवली आहेत. त्यामुळे रमेश आजबे यांनी हरित जामखेड साठी मोलाचे पाऊल उचलले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here