जामखेड न्युज ———
सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथीनिमित्त साकत सप्ताहाध्ये ह.भ.प.उत्तम महाराज वराट यांचे गुलालाचे किर्तन संपन्न
साकतमध्ये श्रीगुरू वै. ह. भ. प. प. पु. आदरणीय वंदनीय रामचंद्र बोधले महाराज यांच्या ४१ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित सप्ताहामध्ये आज ह. भ. प. उत्तम महाराज वराट यांचे गुलालाचे किर्तन झाले कीर्तनासाठी मोठ्या प्रमाणात परिसरातील भाविक भक्त ग्रामस्थ उपस्थित होते.

त्यांनी किर्तन सेवेसाठी पुढील अभंग निवडला होता.
संतांचें सुख झालें या देवा । म्हणऊनि सेवा करी त्यांची ॥१॥
तेथें माझा काय कोण तो विचार । वर्णावया पार महिमा त्यांचा ॥ध्रु.॥
निर्गुण आकार जाला गुणवंत । घाली दंडवत पूजोनियां ॥२॥
तीर्थे त्यांची इच्छा करिती नित्यकाळ । व्हावया निर्मळ आपणांसी ॥३॥
अष्टमहासिद्धीचा कोण आला पाड । वागों नेदी आड कोणी तया ॥४॥
तुका म्हणे ते हे बळिया शिरोमणी । राहिले चरणीं निकटवासें ॥५॥

अर्थ
संतांच्या संगतीने देवाला सुख झाले म्हणून देव त्यांची सेवा करतात.ज्या संतांची सेवा देवाला करायला आवडते त्या संतांचे वर्णन करण्या इतका माझा अधिकार काय?जो निर्गुण असा परमात्मा सगुण साकार होऊन संतांची सेवा करतो पूजा करतो आणि त्यांना दंडवत घालतो,तीर्थे स्वत स्वच्छ होण्यासाठी संतांच्या पदस्पर्शाचि इच्छा करतात,पापी लोकांच्या पापाचे हरण करून ते मलीन झालेले असतात व ते निर्मळ होण्यासाठी संतांच्या पदस्पर्शाचि इच्छा करतात. म्हणून तेथे अस्ष्टमहासिद्धीनां कोणी विचारत नाही.त्यांना कोणी जवळ फिरकू देत नाही.त्यांचा अडथळा कोणी जुमानत नाही.तुकाराम महाराज म्हणतात संत हे बलवंत शोरोमणी आहेत.तरीही विठ्ठलाच्या चरणी त्यांनी निकट वास्तव्य केले आहे.

कीर्तनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. यावेळी हभप हरीभाऊ काळे, हभप बिभीषण महाराज कोकाटे, हभप माऊली महाराज कोल्हे, अशोक सपकाळ महाराज, उतरेश्वर महाराज वराट, पांडुरंग अडसूळ, मनोज महाराज राजगुरू, जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती संजय वराट, परमेश्वर मुरूमकर, राजकुमार थोरवे, नारायण लहाने सह जामखेड भजनी मंडळ, तसेच पारगाव, साकत, ढाळेवाडी, अनपटवाडी, धामणगाव, देवदैठण, पिंपळवाडी, भजनी मंडळ यांच्या सह फोटो ग्राफर शिवशंभो फोटो अतुल दळवी तसेच मोठ्या प्रमाणावर श्रोते हजर होते.

साकतमध्ये श्रीगुरू वै. ह. भ. प. प. पु. आदरणीय वंदनीय रामचंद्र बोधले महाराज हे संत शिवाजी बोधले महाराज व संत माणकोजी बोधले महाराज यांच्या वंशातील नववे सत्पुरुष होते. यांनी साकत मध्ये विठ्ठल मंदिरात १ मे १९५५ मध्ये अखंड विनावादन व नंदादीप सुरू केलेली आजपावोती सुरूच आहे. त्यांच्या ४१ व्या पुण्यतिथीचे आयोजन ह. भ. प. विवेकानंद भारती उर्फ उत्तम महाराज वराट यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व साकत परिसरातील भक्तगणांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
आज गुलालाचे किर्तन झाले उद्या काल्याचे किर्तन हभप उत्तम महाराज वराट यांचेच होईल.
महाराष्ट्रातील मान्यवर किर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक यांनी या सप्ताहिसाठी हजेरी लावली

आज रविवार ०५ रोजी दुपारी १२ते २ हभप उत्तम महाराज वराट यांचे गुलालाचे किर्तन झाले.
आज सायंकाळी ह.भ.प. सुनील महाराज झांबरे आष्टी सायंकाळी ०७ ते ०९ किर्तन होणार आहे.
तसेच सोमवारदि ०६ रोजी सकाळी १० ते १२ हभप उत्तम महाराज वराट यांचे काल्याचे कीर्तन होईल.
या किर्तन सेवेसाठी महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य हभप पंडित केशव महाराज जगदाळे, जालिंदर बप्पा येडशीकर, भरत पठाडे, आसाराम महाराज साबळे, बाजीराव महाराज वराट, मदन महाराज टिपरे, उत्तरेश्वर महाराज टिपरे, भिमराव महाराज मुरूमकर, बाबा महाराज मुरूमकर, बाळू सुरवसे, मच्छिंद्र वाळेकर, हरिदास आबा गुंड, दिपक अडसूळ यांची खास उपस्थिती होती.
गायनाचार्य – हभप बिभीषण महाराज कोकाटे, हरीभाऊ महाराज काळे, कृष्णा महाराज मोरे, ज्ञानेश्वर महाराज कोल्हे, भरत महाराज साठे, नामदेव चव्हाण, अशोक सपकाळ, दिनकर मुरूमकर, भास्कर फुंदे, केशव घोलप, विष्णू म्हेत्रे, दादा आजबे, भाऊसाहेब कोल्हे, पंढरीनाथ राजगुरू, भरत घोलप, आण्णा घुमरे, गहिनीनाथ सकुंडे, प्रकाश महारनवर, नाना महारनवर, जालिंदर महारनवर, कल्याण राऊत, दत्ता घुमरे सह परिसरातील सर्व भजनी मंडळे यांचा सहभाग होता.
भजन कीर्तन व्यवस्थापक दिनकर मुरूमकर, श्रीकांत वराट, पांडुरंग अडसूळ, रामकिसन लहाने, दिपक अडसूळ यांच्या सह परिसरातील भजनी मंडळे आहेत. तसेच गावातील भजनी मंडळ व नर्मदेश्वर वारकरी गुरूकुलातील सर्व विद्यार्थी सात दिवस हजर होते.
सप्ताहाचे संयोजक म्हणून हभप विवेकानंद भारती महाराज उर्फ उत्तम महाराज वराट, मृदंगाचार्य बाजीराव महाराज वराट व उत्तरेश्वर महाराज वराट यांच्या सह संपूर्ण गावकरी नियोजन करत आहेत.










