जामखेड न्युज——
घरापेक्षाची स्वच्छ व सुंदर नानेवाडी शाळा शैक्षणिक गुणवत्तेतही नंबर वन – गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे
समाजसहभागातून बनवलेली सुंदर व आदर्श शाळा तालुक्यासाठी प्रेरणादायी
तालुक्यातील मोहा ग्रामपंचायत हद्दीतील डोगराच्या कुशीत वसलेली छोटीशी वाडी म्हणजे नानेवाडी. यावाडीत इयत्ता ४ थी पर्यंत जिल्हा परिषद शाळा आहे. ही शाळा आपल्या घरापेक्षाही स्वच्छ व सुंदर असून या शाळेची शैक्षणिक गुणवत्ता उत्कृष्ठ आहे. या शाळेचा व शिक्षकांचा सर्व तालुक्यातील शिक्षक, अधिकारी, पदाधिकारी, ग्रामस्थ यांना अभिमान असून ते निश्चितच प्रेरणादायी काम करत आहे ही आनंदाची बाब असल्याचे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी केले आहे .
या शाळेच्या आवारात सुंदर झाडी आहे. शाळेला दोन वर्ग खोल्या असून मुख्याध्यापक कार्यालय आहे. वर्गखोल्या चे बाधकाम उत्कृष्ठ दर्जाचे असून दरवाजे, खिडक्या ‘ सुंदर आहेत. छताला पी. ओ. पी. असून व्हारांड्यात व वर्गात उत्कृष्ट दर्जाची फरशी आहे.
वर्गात एल्. ई. डी. , प्रिटर , आरसा , ग्रंथालय , शैक्षणिक साहित्य मोठ्या प्रमाणावर आहे . मुलामुलींचे स्वच्छ शौचालय आहे . वॉश बेसिन आहे . शाळेच्या छतावर पिण्याच्या पाण्याची टाकी असून , सोलर बसविण्यात आला आहे. त्यातून शाळेची दैनंदिन विजेची गरज भागविली जाते.
या शाळेची गुणवत्ता उत्कृष्ट असून सर्व मुलांचे मराठी, इंग्रजी शुद्ध लेखन चांगले असून गणित विषयासह सर्वच विषयाची विद्यार्थी यांची तयारी चांगली आहे. शाळेत वेगवेगळे सहशालेय उपक्रम राबविले जातात. या शाळेत श्री व सौ घोलप हे पती – पत्नी शिक्षक म्हणून काम करीत असून ते अतिशय मेहनती व कष्टाळू आहे.
समाज सहभागातून त्यांनी सुंदर अशी शाळा बनविली आहे. लवकरच या शाळेवर बीट संमेलन घेऊन इतर शिक्षकांनाही निश्चितच प्रेरणा मिळणार आहे. या शाळेतील विद्यार्थी , शिक्षक ‘ ग्रामस्थ यांचे तालुक्यात सर्वत्र कौतूक होत आहे .