जामखेड तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीमध्ये एकुण 86.37 शांततेत मतदान प्रक्रिया संपन्न उद्या निकाल

0
457

जामखेड न्युज——

जामखेड तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीमध्ये एकुण 86.37 शांततेत मतदान प्रक्रिया संपन्न

उद्या निकाल

 

जामखेड तालुक्यातील जवळा, मतेवाडी, मूंजेवाडी या तीन ग्रामपंचायतीचे मतदान शांततेत पार पडले. मोठ्या असणारया जवळा ग्रामपंचायतमध्ये ८५.४१ टक्के मतेवाडी ग्रामपंचायतमध्ये ८९.२१ टक्के तर मुंजेवाडी ग्रामपंचायतमध्ये ९०.६४ टक्के इतके मतदान झाले. अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली.

तीन सरपंच पदासाठी दहा उमेदवार रिंगणात होते तर 29 ग्रामपंचायत सदस्यांसाठी 59 उमेदवार रिंगणात होते. ईव्हीएम मशीन मध्ये उद्या कोण सरपंच व कोण ग्रामपंचायत सदस्य होतात याचा फैसला होईल.

जवळा ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदासाठी ४ तर सदस्यपदासाठी ३३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. सकाळी जवळा ग्रामपंचायतमध्ये ११ वाजेपर्यंत मतदानाला वेग आला नव्हता. दूपारनंतर कार्यकर्त्यांनी मतदारांची गर्दी वाढली अन् ८५.४१ % मतदान झाले.

मतेवाडी मूंजेवाडी ग्रामपंचायतमध्ये मतदानाला सकाळपासूनच वेग होता. छोट्या ग्रामपंचायतमध्येही मतदारांचा प्रतिसाद चांगला राहीला. तीनही ग्रामपंचायत निवडणुकीत अगदी मतदान पार पडेपर्यंत पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी अनुचित प्रकार ,गैर प्रकार घडू नये म्हणून स्वतः बंदोबस्तावर लक्ष दिले.

जवळा ग्रामपंचायत मध्ये एकुण 5 183 मतदारांपैकी 4427 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला म्हणजे 85.41 टक्के मतदान

मतेवाडी ग्रामपंचायतीमध्ये 760 मतदारांपैकी 678 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला म्हणजे 89.29 टक्के मतदान झाले.

मुंजेवाडी ग्रामपंचायतीमध्ये 652 मतदारांपैकी 591 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला म्हणजे 90.64 टक्के मतदान झाले.

तीन्ही ग्रामपंचायतीमध्ये एकुण 6595 मतदारांपैकी 5696 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला म्हणजे 86.37 टक्के मतदान झाले.

मतदान शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस निरीक्षक महेश पाटील पोलीस उपनिरीक्ष अनिल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्तात मतदान शांततेत पार पडले. उद्या निकाल जाहीर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here