जामखेड न्युज——
जामखेड सौताडा महामार्गावर ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे कामगार युवकाचा हायवा खाली चिरडून जाग्यावर मृत्यू
जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गावर ठेकेदाराच्या हलगर्जीपणा मुळे कामगाराच्या अंगावरून रात्री हायवा गाडी गेली यामुळे गणेश बापू फुलमाळी (वय २०) रा. कानडी बु. ता. आष्टी जि. बीड या कामगाराचा जाग्यावरच मृत्यू झाला आहे यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गचे काम अत्यंत निकृष्ट व संथगतीने सुरू आहे. रात्री बीड रोडवर नायरा पंपासमोर रस्त्याचे काम सुरू असताना कामगार गणेश बापू फुलमाळी हा काम करत होता. पहाटे तीनच्या आसपास तो रस्त्यावर बसलेला असताना खडीचे हायवा टिपर एम. एच. 12 एसएक्स 4185 ही गाडी अंगावरून गेली यामुळे कामगाराचा जाग्यावरच मृत्यू झाला.
मृतदेह ग्रामीण रुग्णालय शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला असून डॉ. राठोड यांनी शवविच्छेदन केले.
कामगाराचा मृत्यू झाला असून देखील रस्त्याचे काम सुरूच होते. अनेक कामगार दारूच्या नशेत असतात. तसेच कामगाराकडे सेफ्टी बेल्ट किंवा सुरक्षिततेचे इतर साधने नाहीत. लाईटची पुरेशी सोय नसते. यामुळे कामगाराचा बळी गेला आहे. याला जबाबदार ठेकेदार आहे यामुळे ठेकेदारावर योग्य कारवाई करावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक महेश पाटील आपल्या टिमसह भेट देत घटनेचा पंचनामा केला.
गणेशला तीन भाऊ आई वडील असा परिवार आहे.
कानडी बु. येथून नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने सहकारी दवाखान्यात येत शोक व्यक्त करत होते.
त्यांच्या मदतीला वंचित बहुजन आघाडीचे जामखेड तालुका अध्यक्ष आतिश (दादा) पारवे सर्व कार्यकर्त्यास भटके विमुक्त समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जामखेड पोलीस स्टेशन येथे ठाम मांडून बसले होते.