Wednesday, February 11, 2026
Home प्रादेशिक बातम्या सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी सप्ताह निमित्त हनुमंत महाराज मते दहिफळकर यांची...

सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी सप्ताह निमित्त हनुमंत महाराज मते दहिफळकर यांची किर्तनसेवा संपन्न

0
442

जामखेड न्युज——

सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी सप्ताह निमित्त हनुमंत महाराज मते दहिफळकर यांची किर्तनसेवा संपन्न

 

हभप उत्तम महाराज वराट यांच्या नेतृत्वाखाली
श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त साकतमध्ये भव्य -दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमत भगवतगिता पारायण सोहळ्याची मोठ्या उत्साहात सोमवार दिनांक ३० पासून सुरूवात झाली आज भजन सम्राट गरूवर्य हनुमंत महाराज मते दहिफळकर यांची किर्तनसेवा संपन्न झाली.

त्यांनी किर्तन सेवेसाठी पुढील अभंग निवडला होता.

समचरणदृष्टि विटेवरी साजिरी ।
तेथें माझी हरी वृत्ति राहो ॥१॥
आणीक न लगे मायिक पदार्थ ।
तेथें माझें आर्त्त नको देवा ॥ध्रु.॥
ब्रम्हादिक पदें दुःखाची शिराणी ।
तेथें दुश्चिंत झणी जडों देसी ॥२॥
तुका म्हणे त्याचें कळलें आम्हां वर्म ।
जे जे कर्मधर्म नाशवंत ॥३॥

अर्थ
हे हरी तुमचे चरण विटेवर सम आहेत तुमची दृष्टीही सम आहे आणि अशा तुमच्या साजर्‍या रूपावर माझी वृत्ती स्थिर राहो.आणि देवा या व्यतिरिक्त मला कोणतेही माइक पदार्थ म्हणजे मायेने व्यापलेले पदार्थ नको व त्या ठिकाणी माझी तृष्णा इच्छा देखील राहू देऊ नका.हे देवा ब्रह्मादिक पदे व या सारखे पदे उच्च ठिकाणी माझे मन जडू देऊ नको कारण ते पद म्हणजे एक प्रकारची दुःखाची शीराणीचा आहे.तुकाराम महाराज म्हणतात देवा जे जे काही कर्म धर्म आहे त्याचे वर्म आता आम्हाला समजले आहे ते म्हणजे असे की हे सर्वकाही नाशिवंत आहे.

कीर्तनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. यावेळी हभप उत्तम महाराज वराट, हभप बिभीषण महाराज कोकाटे, हभप माऊली महाराज कोल्हे, फोटो ग्राफर शिवशंभो फोटो अतुल दळवी तसेच ढाळेवाडी, पारगाव, अनपटवाडी, पारगाव येथील भजनी मंडळ हजर होते.

साकतमध्ये श्रीगुरू वै. ह. भ. प. प. पु. आदरणीय वंदनीय रामचंद्र बोधले महाराज हे संत शिवाजी बोधले महाराज व संत माणकोजी बोधले महाराज यांच्या वंशातील नववे सत्पुरुष होते. यांनी साकत मध्ये विठ्ठल मंदिरात १ मे १९५५ मध्ये अखंड विनावादन व नंदादीप सुरू केलेली आजपावोती सुरूच आहे. त्यांच्या ४१ व्या पुण्यतिथीचे आयोजन ह. भ. प. विवेकानंद भारती उर्फ उत्तम महाराज वराट यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व साकत परिसरातील भक्तगणांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील मान्यवर किर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक येणार आहेत तरी भाविक भक्तांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन ह. भ. प. उत्तम महाराज वराट यांनी केले आहे.

रोज सायंकाळी सात ते नऊ महाराष्ट्रातील नामवंत महाराजांची किर्तन सेवा होणार आहे.

आज सोमवार दि. ३० रोजी ह. भ. प. भजन सम्राट गरूवर्य हनुमंत महाराज मते दहिफळकर यांचे सुश्राव्य असे किर्तन झाले.

मंगळवार दि. ३१ रोजी ह. भ. प. प्रकाश महाराज जंजिरे कर्जत

बुधवार दि. ०१ रोजी गोविंद महाराज शिंदे निमगाव (धा)

गुरूवार दि. ०२ रोजी ह. भ. प. दयानंद महाराज कोरेगांवकर

शुक्रवार दि. ०३ रोजी ह.भ.प.उद्धव महाराज मंडलिक नेवासा

शनिवार दि. ०४ रोजी ह. भप न्यायाचार्य सत्यवान महाराज लाटे

 

तसेच रविवार ०५ रोजी दुपारी १२ते २ हभप उत्तम महाराज वराट यांचे गुलालाचे किर्तन

रविवार दि. ०५ रोजी ह.भ.प. सुनील महाराज झांबरे आष्टी सायंकाळी ०७ ते ०९

तसेच सोमवारदि ०६ रोजी सकाळी १० ते १२ हभप उत्तम महाराज वराट यांचे काल्याचे कीर्तन होईल.

या किर्तन सेवेसाठी महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य हभप पंडित केशव महाराज जगदाळे, जालिंदर बप्पा येडशीकर, भरत पठाडे, आसाराम महाराज साबळे, बाजीराव महाराज वराट, मदन महाराज टिपरे, उत्तरेश्वर महाराज टिपरे, भिमराव महाराज मुरूमकर, बाबा महाराज मुरूमकर, बाळू सुरवसे, मच्छिंद्र वाळेकर, हरिदास आबा गुंड, दिपक अडसूळ आहेत.

गायनाचार्य – हभप बिभीषण महाराज कोकाटे, हरीभाऊ महाराज काळे, कृष्णा महाराज मोरे, ज्ञानेश्वर महाराज कोल्हे, भरत महाराज साठे, नामदेव चव्हाण, अशोक सपकाळ, दिनकर मुरूमकर, भास्कर फुंदे, केशव घोलप, विष्णू म्हेत्रे, दादा आजबे, भाऊसाहेब कोल्हे, पंढरीनाथ राजगुरू, भरत घोलप, आण्णा घुमरे, गहिनीनाथ सकुंडे, प्रकाश महारनवर, नाना महारनवर, जालिंदर महारनवर, कल्याण राऊत, दत्ता घुमरे सह परिसरातील सर्व भजनी मंडळे सहभागी आहेत

भजन कीर्तन व्यवस्थापक दिनकर मुरूमकर, श्रीकांत वराट, पांडुरंग अडसूळ, रामकिसन लहाने, दिपक अडसूळ यांच्या सह परिसरातील भजनी मंडळे

गावातील भजनी मंडळ व नर्मदेश्वर वारकरी गुरूकुलातील सर्व विद्यार्थी सात दिवस हजर राहतील.

सप्ताहाचे संयोजक म्हणून हभप विवेकानंद भारती महाराज उर्फ उत्तम महाराज वराट, मृदंगाचार्य बाजीराव महाराज वराट व उत्तरेश्वर महाराज वराट आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!