जामखेड न्युज—–
मराठा आरक्षणासाठी उद्या जामखेड बंद!!
मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण, महिलांचे उपोषण, कँन्डल मार्च आणि आता उद्या मंगळवारी जामखेड बंद ठेवण्यात येणार आहे. तसे निवेदन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
मराठा आरक्षणासाठी “मराठा योध्दा” मनोज जरांगे पाटील हे गेल्या सहा दिवसापासून अन्न पाण्याचा त्यागकरून मराठा समाजास आरक्षण मिळावे. म्हणुन प्राणात्तीक उपोषणास बसले आहेत. आतापर्यंत सरकारने त्यांच्या मागणीची दखल घेतली नसुन त्यांची प्रकृती अंत्यत चित्ताजनक बनत चालली आहे. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी व मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून जामखेड तालुका बंद ठेवण्यात येणार आहे अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली.
तरी या निर्दयी सरकारला जाग येण्यासाठी व मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या अंदोलनास पाठिंबा म्हणून जामखेड तालुका उदया मंगळवार रोजी दि. 31/10/2023 रोजी बंदचे आव्हान करत आहोत.
मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राजकीय नेते मंडळीबाबत सकल मराठा समाजामध्ये उद्रेकाची भावना निर्माण झाली आहे. मराठा आरक्षणासाठी जामखेड तालुक्यात गेल्या सहा दिवसांपासून साखळी उपोषण सुरु आहे. काल जामखेडमध्ये रणरागिणी मैदानात उतरल्य त्यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु केले आज कँन्डल मार्च आयोजित करण्यात आला होता यासाठी मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.