Saturday, March 28, 2026
Home ताज्या बातम्या नगर जिल्ह्यामुळे प्राथमिक शिक्षक संघास बळ -माधवराव पाटील राज्य शिक्षक...

नगर जिल्ह्यामुळे प्राथमिक शिक्षक संघास बळ -माधवराव पाटील राज्य शिक्षक संघाचे महामंडळ व जिल्ह्याचे त्रैवार्षिक अधिवेशन उत्साहात संपन्न

0
474

जामखेड न्युज——

नगर जिल्ह्यामुळे प्राथमिक शिक्षक संघास बळ -माधवराव पाटील

राज्य शिक्षक संघाचे महामंडळ व जिल्ह्याचे त्रैवार्षिक अधिवेशन उत्साहात संपन्न

 

नगर जिल्हा हा शिक्षक संघाचा बालेकिल्ला असून बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखाली एक मोठा गट आज शिक्षक संघात सामील झाल्याने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची ताकद वाढली आहे त्यामुळे राज्यसंगास बळ मिळाले आहे भविष्यामध्ये बापूसाहेब तांबे यांचा योग्य तो सन्मान करून त्यांना राज्यामध्ये काम करण्याची संधी दिली जाईल. आज बलाढय अशा शिक्षक संघटनेची नितांत गरज असून आजची महामंडळ सभा ही ऐतिहासिक सभा आहे नगर जिल्ह्याच्या शिक्षकांनी घेतलेल्या भूमिकेचे राज्यभर स्वागत झाले आहे असे प्रतिपादन राज्य संघाचे नेते माधवराव पाटील यांनी केले.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची राज्यस्तरीय महामंडळ सभा व जिल्हा संघाचे व जिल्हा गुरुमाऊली सदिच्छा मंडळाचे त्रैवार्षिक अधिवेशन येथील येणार लॉन्स येथे काल अत्यंत उत्साहात संपन्न झाले त्यावेळी राज्यभरातून उपस्थित हजारो शिक्षकांसमोर माधवराव पाटील अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.


व्यासपीठावर राज्य संघाचे अध्यक्ष केशवराव जाधव सरचिटणीस लायकली पटेल सल्लागार दि रा भालतडक सिद्धेश्वर पुस्तके विजय भाकर वसंत हारुगडेतुकाराम कदम स्मिता सोनी विक्रम भैया पाटील शिवाजीराव भोसले जिल्ह्याचे नेते बापूसाहेब तांबे राजेंद्र शिंदे, रविंद्र पिंपळे राजकुमार साळवे दत्ता पाटील कुलट महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा विद्युलता आढाव शिक्षक बँकेचे चेअरमन संदीप मोटे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अंजली मुळे माजी चेअरमन सलीमखान पठाण संतोष दुसुंगे यांच्यासह राज्यभरातील व जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


प्रास्ताविक भाषणात कार्यक्रमाचे निमंत्रक जिल्हा शिक्षक संघाचे नेते बापूसाहेब तांबे यांनी शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ही राज्यातील एक बलाढ्य संघटना असून राज्यातील शिक्षकांचे अनेक महत्त्वाचे प्रश्न त्यांच्या नेतृत्वाखाली या राज्यांमध्ये सुटले आहे.आज राज्यातील शिक्षक वेगवेगळ्या संघटनेमध्ये विभागला गेल्यामुळे शिक्षकांची ताकद कमी होऊन राज्य सरकार मनमानी पद्धतीने शैक्षणिक धोरण राबवीत आहे राज्यातील वाडी वस्तीवरची शाळा टिकण्यासाठी आणि गोरगरी मुलांचे शिक्षण होण्यासाठी शिक्षकांचे प्रश्न सुटण्यासाठी प्रबळ अशा राज्य संघाची गरज आहे आणि म्हणून आम्ही सर्वांनी राज्यसंघामध्ये सामील होऊन राज्यसंग बळकट करण्याचा निर्णय घेतला असे सांगून जिल्ह्यातील 70 टक्के शिक्षक आज आपल्या शिक्षक संघाचे सभासद झाले आहेत शिक्षक बँकेमध्ये आम्ही केलेल्या कारभाराला पसंती देऊन लोकांनी आम्हाला काम करण्याची संधी दिली जिल्ह्यातील सर्वांना सोबत घेऊन आपण पुढे जाणार आहोत असे सांगितले.

शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष केशवराव जाधव यांनी आपल्या भाषणामध्ये राज्यातील विविध प्रश्नांचा परामर्श घेत शिक्षण मंत्री दीपक केसरकर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज सकाळीच याबाबत फोनवर चर्चा केली असून या महामंडळामध्ये आज मंजूर केले जाणारे सर्व ठराव राज्य शासनाकडे पाठवले जाणार असून हे सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दोन्ही मंत्री महोदयांनी दिली आहे राज्यातील मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री महोदय या ठिकाणी येऊ शकले नाही परंतु त्यांनी आपले सर्व प्रश्न सोडविण्याची हमी दिली आहे अशी माहिती दिली.

यावेळी 2005 नंतरच्या शिक्षकांना जुनी पेन्शन मंजूर झाली पाहिजे दहा वीस तीस वर्षाची आश्वासित प्रगती योजना लागू झाली पाहिजे शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये एमएससीआयटीचा प्रश्न निकाली काढून वसुली करण्यात येऊ नये, नगरपालिका महानगरपालिका शिक्षकांना शंभर टक्के वेतन अनुदान द्यावे,निरक्षर सर्वेक्षणावर बहिष्कार असून त्याची सक्ती करण्यात येऊ नये आधी ठराव एकमताने मंजूर करण्यात आले . यावेळी सर्व राज्यसंघ व जिल्हा संघाच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान सत्कार करण्यात आला .
याप्रसंगी जिल्ह्यातील विविध संघटनांचे नेते व कार्यकर्ते यांनी प्राथमिक शिक्षक संघामध्ये प्रवेश केला जिल्ह्यातील स्वराज्य मंडळाचे संपूर्ण कार्यकारिणी, राहता तालुक्याची इब्टा संघटना, शिक्षक संघाच्या थोरात गटाचे अनेक नेते यांनी शिक्षक संघामध्ये प्रवेश केला यामध्ये राजेंद्र ठोकळ, प्रवीण झावरे, नाना गाढवे,अरुण मोकळ ,कैलास चिंधे ,सर्जेराव घोडके, सुहास पवार ,मिलिंद खंडीझोड,प्रतिक नेटके सतीश पठारे अशा मोठ्या संख्येने विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला सर्वांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक संघ गुरुमाऊली सदिच्छा मंडळ महिला आघाडी उच्च अधिकार समिती शिक्षक बँकेचे सर्व आजी-माजी संचालक विश्वस्त मंडळाची विकास मंडळाचे सर्व विश्वस्त आदींनी विशेष परिश्रम घेतले.

याच कार्यक्रमात जिल्हा संघाची पुढील दोन वर्षाची कार्यकारिणी घोषित करण्यात आली यामध्ये जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी बबनराव गाडेकर ,गुरुमाऊली सदिच्छा मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी सुरेश निवडुंगे ,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी वृषाली कडलग,राज्य संपर्कप्रमुख पदी गोकुळ कळमकर ,नाशिक विभागीय अध्यक्षपदी राजेंद्र सदगीर पदवीधर संघाच्या जिल्हाध्यक्षपदी राजु रहाणे ,नगरपालिका महानगरपालिका शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी अमोल कल्हापुरे ,सांस्कृतिक विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी जयेश गायकवाड ,तंत्रस्नेही मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी शिवाजी वाघ उच्चाधिकार समितीचे अध्यक्षपदी राजकुमार साळवे व अर्जुन शिरसाठ तसेच विकास मंडळाच्या सल्लागार समितीच्या जिल्हाध्यक्षपदी भास्कर कराळे, मुख्याध्यापक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी सखाराम सातपुते आदींच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. एकूण दहा विभागाच्या जंबो कार्यकारण्या घोषित करताना 224 पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात आली.

 

कार्यक्रमास राज्यभरातून तसेच जिल्ह्यातून सुमारे पाच हजार शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण पिसे व श्रीमती विना दिघे यांनी केले तर आभार बँकेचे माजी चेअरमन साहेबराव अनाप यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!