मराठा आरक्षणासाठी कुसळंब येथे सरकारची अंत्ययात्रा!!

0
867

जामखेड न्युज——

मराठा आरक्षणासाठी कुसळंब येथे सरकारची अंत्ययात्रा!!

 

 

मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राजकीय नेते मंडळीबाबत सकल मराठा समाजामध्ये उद्रेकाची भावना निर्माण झाली आहे. मराठा आरक्षणासाठी पाटोदा तालुक्यातील आदर्श गाव कुसळंब येथे चक्क सरकारची अंत्ययात्रा काढण्यात आली. आरक्षण देण्याआगोदरच सरकारला देवाज्ञा झाली यामुळे कुसळंबसह परिसरातील नागरिकांकडून दुखवटा व्यक्त करण्यात येत आहे.


शेजारी जामखेड तालुक्यात गेल्या आहे पाच दिवसांपासून साखळी उपोषण सुरु आहे.
आज जामखेडमध्ये रणरागिणी मैदानात उतरल्या होत्या. त्यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु केले आहे. यामुळे आरक्षणासाठी दिवसेंदिवस वातावरण तप्त होत चालले आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील कुसळंब येथे तर सरकारची अंत्ययात्राच काढण्यात आली सर्व विधी पुर्ण केले. 

कुसळंब येथे आज सकाळी गावातील ज्येष्ठ, तरूण, युवक, शालेय विद्यार्थी तसेच माता भगिनी खंडेश्वर मंदिरासमोर जमले होते तिरडी बांधली
सरकारचा प्रतिकात्मक पुतळा तयार करून त्याला चपलांचा हार घातला. रडारड सुरू झाली. चार जणांनी खांदा दिला. आणी अंत्ययात्रा स्मशानभूमीत काढण्यात आली ती स्मशानभूमीत गेले. तिथे मोठ्या प्रमाणात सरकार विरोधात घोषणा बाजी तसेच मोठ्या प्रमाणावर रडारड सुरू झाली.

चिता रचली सरकारचे प्रतिकात्मक प्रेत ठेवले अग्नीडाग देण्यात आला तसेच संपूर्ण परिसराने सरकारच्या निषेधार्थ दुखवटा पाळण्यात येणार आहे. उद्या सावडणे व नंतर दशक्रिया विधीही करण्यात येणार आहे. आतातरी सरकारने लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी जनतेची भावना आहे.

 

कुसळंबसह परिसरातील नागरिकांकडून दुखवटा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here