जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट) –
दि, पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या आवारात आज वृक्षारोपण करत नवनियुक्त सचिव शशिकांत देशमुख यांचे स्वागत करण्यात आले.
विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष उद्धवराव देशमुख, उपाध्यक्ष अरुणशेठ चिंतामतणी, सचिव शशिकांत देशमुख, खजिनदार राजेशजी मोरे, प्राचार्य श्रीकांत होशिंग, उपप्राचार्य पोपट जरे, उपमुख्याध्यापक श्रीधर जगदाळे, पर्यवेक्षक रमेश अडसूळ, कार्यालयीन अधीक्षक ईश्वर कोळी, रामचंद्र होशिंग भाऊसाहेब, हरित सेना प्रमुख बबन राठोड, विशाल पोले, किशोर कुलकर्णी, उमाकांत कुलकर्णी, शेटे भाऊसाहेब, सावंत, हनुमंत वराट, प्रमोद बारवकर, प्रवीण कुलकर्णी सर्व उपस्थित होते.

संस्थेचे सचिव असणारे मोरेश्वर देशमुख यांचे निधन झाल्याने त्या जागी सर्व सभासदांच्या सहमतीने शशिकांत देशमुख यांची निवड करण्यात आली. आज सचिव देशमुख हे कामकाजासाठी आले असता त्यांच्या व अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार या संचालक मंडळाच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यामुळे नवनियुक्त सचिवांचे स्वागत वृक्षारोपण करून करण्यात आले.