जिजाऊ माँसाहेबांच्या विचारांमुळे आपल्याला प्रेरणा मिळते – गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे

0
199
जामखेड प्रतिनिधी 
           जामखेड न्युज – – (सुदाम वराट) – 
राजमाता जिजाऊ माँसाहेबांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे घडले महाराष्ट्राच्या भूमीत शेतकऱ्यांचे राज्य रयतेचे स्वराज्य स्थापन झाले जिजाऊ माँसाहेबांच्या विचारांनी शिवाजी महाराजांना घडवल तसेच हजारो मावळ्यांना प्रेरणा दिली याच विचारांवर महाराष्ट्र आजपर्यंत घडला यापुढेही घडत राहिल जिजाऊ माँसाहेबांचे विचार व  संस्कारांमुळे आपल्याला नेहमीच बळ व प्रेरणा मिळते असे गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांनी सांगितले.

श्री अरण्येश्वर विद्यालय अरणगाव येथे स्वराज्य जननी, राष्ट्रमाता माॅं साहेब जिजाऊ यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले होते.

या वेेळी  गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे, विद्यालयाचे प्राचार्य रमेश वराट, केंद्रप्रमुख सुरेेश कुंभार, तसेे अरणगाव केंद्रातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली व आपल्याला स्वराज्य मिळाले, स्वातंत्र्य मिळाले पण स्वातंत्र्याचा अर्थ प्रत्येकाने आपापल्या सोयीने घेतला आणि स्वैराचार सुरू झाला आता पुन्हा एकदा या स्वराज्याला सुराज्य बनवनारा शिवाजी जन्माला आला पाहिजे असे प्रत्येकाला वाटते पण तो शिवाजी माझ्या घरात नको अशी आपली अवस्था झाली आहे.कारण शिवाजी जन्माला घालण्यासाठी अगोदर जिजाऊ सारखे व्यक्तिमत्त्व घडावे लागते. यासाठी माताभगिनींनी स्वतःला जिजाऊ सारखे सक्षम घडवले पाहिजे. असे प्रतिपादन शिंदे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य रमेश वराट, सुत्रसंचलन दिपक तुुपेरे तर आभार पवार यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here