जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट) –
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा आज ५५ वा वर्धापन दिन गेल्या पाच दशकांपासून राज्याच्या राजकारणात व समाजकारण शिवसेनेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे ऐंशी टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या तत्त्वावर शिवसेना काम करत आहे यानुसार जामखेड तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसेना वर्धापन दिनानिमित्त वृद्धाश्रमातील वृद्धांना किराणा व फळे भाजीपाला बिस्किटांचे वाटप करण्यात आले.
८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या तत्त्वावर शिवसेना काम करत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपर्क प्रमुख संजय घाडी, सहसंपर्कप्रमुख डॉ.विजय पाटील व जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी यांच्या आदेशानुसार
जामखेड तालुका शिवसेनेच्या वतीने धाराशिव जिल्ह्यातील नळी वडगाव येथील वृद्धाश्रमातील वृद्धांना किराणा व फळे भाजीपाला बिस्किटांचे वाटप शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद यांच्या नेतृत्वाखाली वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद, युवा सेना तालुकाप्रमुख सावता हजारे, उप तालुकाप्रमुख संतोष वाळुंजकर, जवळका सरपंच सुभाष माने, ज्येष्ठ शिवसैनिक नाना रासकर, शहरप्रमुख गणेश काळे, अल्पसंख्यांक प्रमुख नासिर खान, युवा सेना तालुकाउपप्रमुख सुहास मदने, अक्षय येवले, अमोल घाटे, गणेश भाऊ यांच्या सह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.