जामखेड न्युज——
शिऊर येथील पै. सौरभ गाडे यांची महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेसाठी निवड
जामखेड तालुक्यातील पै. सौरभ गाडे यांची आज झालेल्या निवड चाचणी स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यातून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यामुळे जामखेड व शिऊर परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सौरभ गाडे यांनी कुस्तीचे प्राथमिक धडे शिऊर गावातच पै. विठ्ठल देवकाते यांच्या कडे घेतले. एक गुणी पैलवान म्हणून त्याची ख्याती आहे.
पै. सौरभ गाडे हे सध्या पुणे येथे मामासाहेब मोहोळ यांच्या कडे कुस्तीचे धडे घेत आहे.
सौरभ गाडे अहमदनगर जिल्ह्यातुन निवड झाली आहे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे साठी निवड आहे. याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.