जामखेड न्युज——
श्रेयस वराट, अदित्य जायभाय व योगेश वाघमोडे यांची राज्यस्तरीय शालेय वुशु स्पर्धेसाठी निवड
नुकत्याच जामखेड येथे पार पडलेल्या पुणे विभागीय शालेय वुशु क्रीडा स्पर्धेत जामखेड येथील खेळाडू श्रेयस वराट, अदित्य जायभाय व योगेश वाघमोडे यांनी सुवर्णपदक पटकावले यामुळे त्यांची अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय वुशू स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे अंतर्गत, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,व जिल्हा क्रीडा परिषद अ.नगर आणि अ.नगर जिल्हा वुशु संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे विभागीय शालेय वुशु क्रीडा स्पर्धा जगदंबा लॉन्स,जामखेड येथे संपन्न झाल्या.
स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी मा.जि.प.सदस्य प्रा.मधुकर राळेभात, शिवसेना तालुकाप्रमुख संजय (काका) काशीद, सौ.रोहिनीताई काशीद, राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरंगे, अ.नगर जिल्हा वुशु संघटनेचे सचिव प्रा.लक्ष्मण उदमले, उपाध्यक्ष शाम पंडित, प्रल्हाद साळुंके यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये जामखेड च्या खेळाडूंनी तीन सुवर्ण पदक पटकावले. सुवर्ण पदक विजेते खेळाडू- श्रेयस सुदाम वराट, अदित्य अजिनाथ जायभाय आणि योगेश वाघमोडे या खेळाडूंची निवड अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय वुशु स्पर्धेसाठी झालेली आहे. सर्व खेळाडू जिल्हा संघटनेचे सचिव व आंतरराष्ट्रीय खेळाडू लक्ष्मण उदमले, उपाध्यक्ष शाम पंडित, रोहित थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन मराठी शाळा,जामखेड येथे सराव करत आहेत.
श्रेयस वराट, अदित्य जायभाय व योगेश वाघमोडे
याच्या यशाबद्दल आमदार रोहित पवार, विधानपरिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे, पोलीस निरीक्षक महेश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. मधुकर राळेभात, उमेश देशमुख प्राचार्य श्रीकांत होशिंग, प्राचार्य बी. के. मडके, मा. प्राचार्य श्रीराम मुरुमकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, उपसभापती कैलास वराट, शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद, माजी सभापती संजय वराट, प्रतिक जाधव, यश जाधव, संदेश गोरे, कृष्णा वनवे, विशाल धोत्रे, सौरभ आडाले, सुरज उगले सह तालुक्यातील पत्रकार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.