जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला पाण्याअभावी तडे

0
847

जामखेड न्युज——

जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला पाण्याअभावी तडे

 


जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. यामुळे पावसाळ्यात चिखल, उन्हाळ्यात धुळीमुळे जामखेड परिसरातील वाहनधारक व नागरिक एक वर्षापासून हैराण आहेत. यातच काही ठिकाणी पहिला कच्चा सिमेंटचा रस्ता तयार केला आहे. पण तो करताना कमी प्रमाणात सिमेंट वापरल्याने तसेच त्यावर व्यवस्थीत पाणी न मारल्यामुळे बीड रोडवरील रस्त्याला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्याला चिरा पडल्या आहेत. आता याच रस्त्यावर पक्का रस्ता बनवला जाणार आहे. यामुळे निश्चितच या रस्त्याचे आयुष्य कमी होणार आहे.


जामखेड साठी दोन आमदार असतानाही शहरात सह नगर रोड व बीड रस्त्याची अत्यंत दुरावस्था आहे. यामुळे दररोज अनेक अपघात होत आहेत. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेकांना अपंगत्व आले आहे. पावसाळ्यात चिखल, उन्हाळ्यात धुळ, रस्त्यावरील खड्डे यामुळे चिंचपूर ते जामखेड व जामखेड ते सौताडा रस्त्याची खुपच दुर्दशा झाली आहे. यामुळे अनेक लोक जामखेड सोडून नगर पुण्याला स्थलांतरित होऊ लागले आहेत. ठेकेदाराने ताबडतोब रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी होत आहे. ठेकेदारांने कामाची गती वाढवली पण दर्जा बाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. कच्चा सिमेंटचा रस्ता केला आहे त्याला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत.

चिंचपूर ते जामखेड व जामखेड पंचदेवालय ते सौताडा या रस्त्याची मोठी दुर्दशा झाली आहे. एका वर्षापासून काम सुरू आहे रस्ता खोदून ठेवला आहे. त्यावर मातीमिश्रीत मुरूम यामुळे पावसाळ्यात चिखल दलदल, तर पाऊस उघडला कि, धुळच धुळ तसेच खड्डे यामुळे जामखेड परिसरातील नागरिक वाहनधारक हैराण झाले आहेत. अनेक जण तर जामखेड म्हटले तरी नको रे बाबा असे म्हणतात. एक वर्ष झाले तरी राष्ट्रीय महामार्ग कामाची गती नाही. शहरात अद्याप तशीच परिस्थिती आहे. सध्या धुळीने नागरिक हैराण झाले आहेत. यामुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सलग काम सुरू नाही कामाचे अनेक तुकडे केले आहेत. जे काम झाले तेही दर्जेदार नाही. अनेक ठिकाणी तडे गेल्याने दर्जा बाबत शंका उपस्थित केली जात आहे.


अनेक लोक जामखेड वगळून दुसऱ्या मार्गाची निवड करत आहेत तर अनेक प्रतिष्ठित नागरीक जामखेड शहर सोडून नगर पुण्याला स्थायीक होऊ लागले आहेत. त्यामुळे ताबडतोब रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा व नागरिकांचे स्थलांतर थांबवावे अशी मागणी केली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्यातून जामखेड ते सौताडा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी. रस्ता १५७.६२ कोटी रुपयांचा रस्ता ठेकेदार ईपीसी कंत्राटदार, धनेश्वर कन्स्ट्रक्शन, गणेश कन्स्ट्रक्शन या तीन ठेकेदारांनी ८६.०९ कोटी रुपयांना काम घेतले आहे. या कामाचे भूमीपूजन खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार प्रा राम शिंदे यांनी दि. २४ फेब्रुवारी २४ रोजी केले आहे. अठरा महिन्यात काम करण्याचा कालावधी आहे आठ महिने झाले तरी फक्त रस्ता खोदून माती मिश्रीत मुरूम टाकल्याने सध्या अनेक गाड्या घसरत आहेत. मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. शहरातील अतिक्रमणे तशीच आहेत. लहान लहान टपरी धारकांनी आपापले अतिक्रमण काढले पण शहरातील मोठ मोठे अतिक्रमण तसेच आहेत कामाची गती खुपच संत गतीने होत आहे. यामुळे नागरिक हैराण आहेत. आता तर कामालाच तडे गेल्याने कामाबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here