जामखेड न्युज——
ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेत पुन्हा सुरू झाला ठेवीचा ओघ
जामखेड शाखेत आज ग्राहकांची ठेवल्या लाखो रूपयांच्या ठेवी – सचिन खांडे
तिरुमला उद्योग समुहास क्लिन चिट
मागील दोन दिवसांत जामखेड सह इतर ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेबाबत अफवा उठवली होती. यामुळे अनेक ग्राहकांनी ठेवी काढून घेण्यासाठी बँकेत गर्दी केली होती. तेव्हा बँकेतील आपल्या ठेवी सुरक्षित आहेत या अफवांवर विश्वास ठेवू नका, ज्यांचा विश्वास नसेल ते आपल्या ठेवी कधीही घेवून जावू शकता. फक्त गर्दी करू नका आणि शिस्तीमध्ये घेवून जाव्यात असे आवाहन जामखेड ज्ञानराधा बँकेचे व्यवस्थापक सचिन खांडे यांनी केले होते. तेव्हा पुन्हा ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यात बँक यशस्वी झाली असून आज जामखेड सह सर्वच शाखेत लाखो रूपयांच्या ठेवीचा ओघ सुरू झाला आहे.
छापा तिरुमलावर गर्दी ज्ञानराधात
सविस्तर माहिती अशी की, तिरूमला उद्योग समुहाच्या तपासणीसाठी आयकर विभागाने तपासणी करत असताना गर्दी मोठ्या प्रमाणावर बँकेत गर्दी झाली होती. तपासणी मध्ये संपूर्ण उद्योग समुहास क्लीन चीट मिळाली आहे. यामुळे परत ग्राहकांचा विश्वास निर्माण झाला आहे.
आयकर विभागाच्या या तपासणी नियमित असतात. या तपासणीचा आणि उठवलेल्या अफवांचा संबंध लावून ठेवीदार आपल्या ठेवी काढून घेण्यासाठी मोठी गर्दी करत होते. तुमच्या ठेवी आहेत त्या काढून घेण्याचा अधिकार तुम्हाला आहे. फक्त गर्दी करू नका. या आवाहनाला ग्राहकांनी प्रतिसाद दिला फक्त शुक्रवारी गर्दी होती शनिवारी व रविवारी बँक चालू ठेवण्यात आली होती लोकांनी ठेवी काढून घेण्यापेक्षा आता परत ठेवी ठेवण्याकडे लोकांना कल वाढला आहे.
बँकेचे अध्यक्ष सुरेश कुटे यांनीही ‘कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. तुम्ही जेव्हा बँकेमध्ये याल तेव्हा तुमचे पैसे आम्ही देऊ’, असं स्पष्ट केलं होत. या सर्वांचा परिणाम परत ग्राहकांचा बँकेवर विश्वास निर्माण झाला आहे व पुन्हा ठेवी सुरू झाल्या आहेत.