जामखेड न्युज——
जामखेड तालुका डॉक्टर असोसिएशन व सुरभी हॉस्पिटल अहमदनगर तर्फे गुणवंत डॉक्टरांचा सत्कार संपन्न
कमीत कमी मूल्य आकारून चांगली वैद्यकीय सुविधा देणार – डॉ. संजय राऊत
परिसरातील वेगवेगळ्या क्षेत्रात उतुंग यश मिळवलेल्या तसेच अनेक डॉक्टर पाल्यांचा एमडी मेडिसिन साठी निवड झालेले पाल्य व पालकांचा जामखेड तालुका डॉक्टर असोसिएशन व सुरभी हाँस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.
सुरभी हॉस्पिटल अहमदनगर व जामखेड तालुका डॉक्टर्स असोसिएशन संयुक्त विद्यमान कार्यशाळा संपन्न झाली त्यामध्ये तालुक्यातील आरोग्याचा प्रश्न देण्यात येणाऱ्या सुविधा यावर भविष्यकालीन योजना तयार करण्यात आली तसेच डॉक्टर सुरज सुरेश काशीद यांनी एमडी मेडिसिन डॉक्टर वेदांत दिंडोरे एमडी मेडिसिन, डॉक्टर ऐश्वर्या कुमटकर एमबीबीएस यांनी वैद्यकीय क्षेत्रातील उच्च पदवी प्राप्त केल्याबद्दल व डॉक्टर पांडुरंग सानप यांनी लेह लडाख येथील खडतर अशी त मॅरेथॉन पूर्ण केल्याबद्दल व्यासपीठावरून त्यांचा आदर सत्कार
करण्यात आला
सुरभी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर रोहित फुलवर, डॉक्टर भराडीया डॉक्टर सुलभा पवार डॉ आजमेरे यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी तालुक्यातील सर्व डॉक्टर्स उपस्थित होते.
याप्रसंगी डॉक्टर संजय राऊत अध्यक्ष जामखेड तालुका डॉक्टर असोसिएशन बोलताना सांगितले की ही असोसिएशन सर्व घटकांना घेऊन काम करत आहे भविष्यामध्ये सर्व गुणवंताचा व चांगले काम करणारे वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींचा योग्य ते व्यासपीठावर यथोचित गौरव केला जाईल व रुग्णांचे हे हित जपले जाईल जामखेड तालुक्यात कमीत कमी मूल्य आकारून चांगली वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगितले