सात महिन्यांपासून अंधारात असलेल्या गावाला, आमदार रोहित पवार यांच्या फोनवर मिळाला ट्रान्सफॉर्मर

0
854

जामखेड न्युज——

सात महिन्यांपासून अंधारात असलेल्या गावाला, आमदार रोहित पवार यांच्या फोनवर मिळाला ट्रान्सफॉर्मर

 

जामखेड तालुक्यातील सांगवी येथील कदमवस्ती वरील ट्रान्सफॉर्मर जानेवारी महिन्यात जळाला होता महावितरण कडे वारंवार मागणी करूनही ट्रान्सफॉर्मर मिळत नव्हता. यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. संपूर्ण वस्ती अंधारात होती. पिण्याच्या पाण्याची अडचण होती.

गावातील लोकांची अडचण लक्षात घेऊन
गावातील युवा कार्यकर्ते चरण कदम यांनी
ग्रामस्थांना घेऊन आमदार रोहित (दादा) पवार यांची भेट घेतली व गावाची अडचण सांगितली. तेव्हा आमदार पवार यांनी आठ दिवसात तुमच्या वस्तीवर नवीन ट्रान्सफॉर्मर मिळेल असा शब्द दिला होता. यानुसार सातव्या दिवशी गावात नवीन ट्रान्सफॉर्मर बसविलेला आहे.

आमदार रोहित (दादा) पवार यांना गावातील ट्रान्सफॉर्मर बाबत माहिती देताना चरण कदम बरोबर प्रविण कदम, ओंकार कदम, किरण कदम, संतोष कदम हे कार्यकर्ते उपस्थित होते.

गेल्या सात महिन्यांपासून अंधारात असलेल्या गावाला आमदार रोहित (दादा) पवार यांच्या फोनमुळे सात दिवसात ट्रान्सफॉर्मर मिळाला आहे यामुळे ग्रामस्थांनी आमदार रोहित (दादा) पवार यांचे आभार मानले आहेत.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here