जामखेड न्युज——
शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद मित्रमंडळाच्या वतीने गुणवंतांचा सत्कार

श्री साकेश्वर विद्यालयाचे शिस्तप्रिय मुख्याध्यापक म्हणून ख्याती असलेले दत्ता काळे यांना अहमदनगर माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वतीने गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार मिळाला, तसेच पप्पू काशिद यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद मित्रमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद,
गुणवंत मुख्याध्यापक दत्ता काळे, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, पप्पू काशिद, मनसे नेते दादासाहेब (हवा) सरनोबत, सनी सदाफुले, संतोष गव्हाळे, आकाश साठे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थी हितासाठी नेहमी तळमळ असलेले काळे यांना २०१३-१४ मध्ये अहमदनगर सह्याद्री उद्योग समूहाच्या वतीने आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाला होता. आता त्यांच्या कामाची पावती म्हणून जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार मिळाला होता. गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार मिळाला म्हणून तसेच पप्पू काशिद यांचा वाढदिवसानिमित्त दोघांचा सत्कार करण्यात आला.




