जामखेड न्युज——
हिंदी हि रोजगाराची भाषा – प्रा. मोहसीन शेख
जामखेड महाविद्यालयात हिंदी दिन संपन्न
हिंदी केवळ अध्ययन अध्यापनाची भाषा नाही तर रोजगाराची भाषा आहे. आज सर्व क्षेत्रात हिंदीचा उपयोग केला जातो. देश व विदेशात सर्व दूर हिंदी भाषा पोहचली आहे. असे मत प्रा. मोहसीन शेख यांनी हिंदी दिन कार्यक्रमात व्यक्त केले.

जामखेड महाविद्यालयात हिंदी विभागाच्या वतीने “हिंदी दिनाचे” आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. फलके ए. बी. कला विभाग प्रमुख जामखेड महाविद्यालय जामखेड हे होते.

प्रमुख पाहुणे म्हणून श्री संत गजानन महाविद्यालय, खर्डा येथील प्रा. मोहसीन शेख हे होते. या प्रसंगी त्यांनी “बदलते परिदृश्य मे हिंदी” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बोलताना ते म्हणाले की हिंदी केवळ अध्ययन अध्यापनाची भाषा नाही तर रोजगाराची भाषा आहे. आज सर्व क्षेत्रात हिंदीचा उपयोग केला जातो. देश व विदेशात सर्व दूर हिंदी भाषा पोहचली आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. फलके ए. बी. यांनी मराठी ही आपली मातृभाषा आहे तशीच हिंदी ही मावशी आहे. तिचा विनिमय सर्वांनी जास्तीत जास्त करावा. या शब्दात आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच प्रा. महारनवर सर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभाग अध्यक्ष श्रीमती डॉ. देशपांडे रत्नमाला यांनी केले उपस्थितांचे आभार प्रा. राहुल भाकरे सर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदी विभागाचे प्रा. राहुल कांबळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विविध विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



