जामखेड तालुका प्राथमिक शिक्षक संघ ( थोरात गट ) अध्यक्षपदी श्री नानासाहेब मोरे यांची निवड

0
273

जामखेड न्युज——

जामखेड तालुका प्राथमिक शिक्षक संघ ( थोरात गट ) अध्यक्षपदी श्री नानासाहेब मोरे यांची निवड

 

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघात कार्यरत असणारे जिल्हयातील व तालुक्यातील शिक्षक नेत्यांनी प्राथमिक शिक्षक संघ (शिवाजीराव पाटील गट)व सदिच्छा मंडळा बरोबर जाण्याच्या निर्णयाच्या विरोधी भूमिका घेऊन जामखेड तालुक्यातील श्री किसन वराट व त्यांचे सहकारी यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघातच (थोरात गट) थांबण्याचा निर्णय घेतला.


त्यामुळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस श्री आबासाहेब जगताप यांनी दखल घेऊन जामखेड तालुका अध्यक्ष पदी श्री नानासाहेब मोरे यांची निवड केली.


याप्रसंगी प्रातिनिधीक स्वरुपात श्री दत्तात्रय यादव श्री चंद्रकांत पांडुळे श्री नवनाथ बुडगे श्री अभिमान घोडेस्वार उपस्थित होते.


श्री नानासाहेब मोरे यांच्या अध्यक्ष पदाच्या निवडीचे पत्र देताना राज्य सरचिटणीस श्री आबा साहेब जगताप शिक्षक नेते श्री संजय कळमकर तसेच जिल्हाध्यक्ष श्री बाळासाहेब सालके श्री सुदर्शन शिंदे श्री राजेंद्र ठाणगे श्री बाळासाहेब देंडगे श्री सुनिल साठे श्री किसन बोरुडे तसेच चिंचोंडी पाटील गावचे सरपंच शरद भाऊ पवार उपस्थित होत निवडी प्रसंगी खऱ्या व प्रामाणिक कार्यकर्त्यास न्याय दिल्याची भावना श्री किसन वराट तसेच नानासाहेब मोरे यांनी व्यक्त केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here