जामखेड न्युज——
चव्हाण बंधूंचे कार्य आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय – उपसभापती कैलास वराट
शेतकरी पुत्रांचा शेतकरी मार्केट कमिटी मध्ये सन्मान!!
चव्हाण बंधू यांचे शैक्षणिक सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे. शेती बरोबरच शिक्षण क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांनी सांगितले. अहमदनगर जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्यामुळे एकनाथ पंढरीनाथ चव्हाण व कृतीशील शेतकरी पुरस्कार मिळाल्याबद्दल आप्पादादा भानुदास निकम यांचा सन्मान जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेत दोन्ही शेतकरी पुत्रांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, उपसभापती कैलास वराट, माजी सभापती व विद्यमान संचालक सुधीर राळेभात, संचालक सचिन घुमरे, नारायण जायभाय, राहुल बेदमुथ्या, अंकुश ढवळे, सतिष शिंदे, गजानन शिंदे, गणेश जगताप, सुरेश पवार, विष्णु भोंडवे, नंदकुमार गोरे, वैजिनाथ पाटील, सिताराम ससाणे, रविंद्र हुलगुंडे, विठ्ठल चव्हाण, माजी संचालक मंकरद काशिद सह सर्वच आजी माजी संचालक, व्यापारी व शेतकरी तसेच सचिव वाहेद सय्यद, किरण मोरे, शिवाजी ढगे, अशोक यादव, अशोक मुळे, सागर राळेभात, धोंडू कवटे, सुशीलकुमार सदाफुले, जयराम जाधव, श्रीकांत समुद्र, शेख, अनंते, भोगे या सर्वांच्या उपस्थितीत झाला.
माझ्या बरोबर माझे मित्र शिक्षक बँकेचे संचालक संतोषकुमार राऊत,विश्वस्त मुकुंदराज सातपुते, जिल्हा शिक्षक नेते विकास बगाडे, गुरूमाऊली मंडळाचे अध्यक्ष पाडुरंग मोहळकर, प्राथ.शि. संघ उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष राजीव मडके यांचाही सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात मुकुंदराज सातपुते यांनी प्राथ.शाळा बसरवाडीचा शैक्षणिक आलेख मांडला.त्याचबरोबर शिक्षणाचे खाजगीकरणाबाबत जागृतीची गरज व्यक्त केली.
एकनाथ चव्हाण यांनी सत्काराला उत्तर देतांना म्हणाले की, पगंतीत जर वाढणारी व्यक्ती ओळखीची असली तर ताटात वाढ व्यवस्थित होते . असा उल्लेख करून कैलास वराट सर शिक्षक असल्यामुळे ओळखीचा वाढप्या असल्यामुळे येथे सर्वसाधारण सभेत शिक्षकाचा सन्मान होत आहे.हा सन्मान सभापती शरद (दादा )कार्ले,उपसभापती कैलास वराट सर,नेते सुधीरदादा राळेभात व सर्वच विठ्ठलदादा चव्हाण यांचे संचालक मित्र यांच्या प्रेमाचा हा सन्मान आहे.
सहकारमहर्षी जगन्नाथ(तात्या)राळेभात यांनी गणपती मंदिर,मार्केट गाळे, छत्रपती शिवाजी महाराज मार्केट कमिटी कमान आणि चिंचाची लावलेली झाडे आजही तात्यांची आठवण करून देतात सभापती, उपसभापती व सर्व संचालक बोर्डाने असेच मुलांच्या शिक्षणासाठीच्या वस्तीगृहाचे, शेतकरी मुक्कामासाठी किंवा आरामासाठीचा सुसज्ज निवारा, शेतकरी मार्केट गार्डन अशा चिरंतन आठवणीत शेतकरी उपयोगी काम व्हावे हि इच्छा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचन अशोक यादव यांनी केले.