जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट) –
बोगस सोयाबीन बियाणांमुळे दुबार पेरणीचे संकट ओढावलेल्या शेतकऱ्यांना एक वर्ष झाले पंचनामे झाले तरीही अद्यापही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महाबीज कंपनी कडून पाचही पैशाची मदत केलेली नाही. त्यामुळे महाबीज कंपनीविरोध शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
गेल्या वर्षी खरीप हंगामात साकत परिसरातील अनेक शेतक-यांनी आपल्या शेतात महाबीज कंपनीच्या सोयाबीन बियाणांची पेरणी केली होती. पण बोगस बियाणांमुळे उगवण झाली नव्हती. दुबार पेरणीचे संकट ओढवलेले होते. अशा तक्रारी कृषी विभागाकडे दाखल झाल्या होत्या. कृषी विभागाने प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे केले होते. एक वर्ष झाले तरीही शेतकरी मदती पासून वंचित आहेत. इतर सोयाबीन उत्पादक कंपन्यांनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई ताबडतोब दिली पण महाबीज कंपनीने शेतकऱ्यांना अद्यापही पाचही पैशाची नुकसान भरपाई दिलेली नाही. यामुळे शेतकरी वर्गात महाबीज कंपनी बदल नाराजीचे वातावरण आहे.
गेल्या खरीप हंगामात अनेक शेतक-यांनी महाबीज कंपनीचे सोयाबीन आपल्या शेतात पेरले होते. पण ते उगवले नव्हते तेव्हा अनेक तक्रारी कृषी विभागाकडे दाखल झाल्या होत्या तेव्हा कृषी विभाग महाबीज सोयाबीन कंपनीचे अधिकारी यांनी तक्रारदार शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे केले होते. शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. आर्थिक बुर्दड सहन करावा लागला होता. या तक्रारी तहसीलदार यांच्या कडेही दाखल झाल्या होत्या इतर कंपनीने ताबडतोब शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली पण महाबीज कंपनीने कसलीही नुकसान भरपाई दिलेली नाही यामुळे महाबीज कंपनीविरोधात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
महाबीज कंपनी तालुक्यात उडीद बिजोत्पादन करणार आहे ही चांगली गोष्ट आहे पण गेल्या वर्षी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कंपनीने भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी लक्ष घालून गेल्या वर्षी दुबार पेरणीचे संकट ओढावलेल्या शेतकऱ्यांना ताबडतोब महाबीज कंपनी कडून नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी साकत परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.