आमदार रोहित पवारांकडून सलून दुकानदारांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप – खर्ड्यातील कार्यकर्त्यांच्या सलून मध्ये करवून घेतली दाढी

0
237
जामखेड प्रतिनिधी 
             जामखेड न्युज – – (सुदाम वराट) – 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाद्वारे लागू करण्यात आलेल्या नियमांमध्ये शिथिलता येत असल्याने सर्व स्थरातील व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. टप्प्या-टप्प्याने लॉकडाउनचे नियम शिथिल होवून बाजापेठांमधील व्यवहार पूर्ववत होत असले तरी कोरोनाचा धोका अद्यापही टळलेला नसल्याने प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. हि बाब लक्षात घेवून आमदार  रोहित पवारांनी सलून दुकानदारांना मागील वर्षीप्रमाणे यावर्षी देखिल मास्क आणि सँनिटायझरचे वाटप केले. आमदारकीचा बडेजाव बाजूला ठेवून सामान्य कार्यकर्त्यांप्रमाणे कार्यकर्त्यांच्या सलून मध्ये जाऊन दाढी करवून घेतली. त्यामुळे परिसरात कुतुहल निर्माण झाले.
आमदार रोहित पवार जामखेड दौऱ्यावर असताना सदर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. जामखेड मधील खर्डा येथे प्रतिनिधी स्वरुपात कार्यक्रम घेवून प्रत्यकी ५०० मि. ली. सँनिटायझर व मास्क च्या किट चे वाटप करण्यात आले. अनेक छोट्या व्यवसायकांना लॉकडाउनमध्ये फटका बसल्याने सद्या परिस्थिती पूर्ववत होत असताना प्रत्येकाने स्वत :च्या आरोग्याची काळजी घेणे ही गरजेचे असल्याने त्यांना मदत म्हणून ह्या उपक्रमाची सुरुवात केल्याचे पवार यांनी सांगितले.
सलून व्यावसायिकांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न जाणून घेवून त्यांना मदतीचे आणि कायम सोबत असल्याचे आश्वासन पवार यांनी दिले.
दरम्यान, कार्यक्रम संपवून आपल्या व्यस्त नियोजनातून वेळ काढत पवार यांनी आपल्या खर्डा येथील कार्यकर्त्याच्या सलून मध्येच दाढी करवून घेवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. पवार हे अचानक सलूनमध्ये येवून दाढी करवून घेण्यासाठि बसले असता दुकानदाराचीही चांगलीच धावपळ झाली. रोहित पवार हे नेहमीच नवउद्योजकांना प्रोत्साहन देत असतात. उद्घाटनाला जाने किंवा अचानक एखाद्या दुकानास भेट देवून त्यांच्याशी चर्चा करून प्रश्न जाणून घेतात व कायम सोबत असल्याचा विश्वास देत असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here