रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात – सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी

0
197
जामखेड प्रतिनिधी 
            जामखेड न्युज – – ( सुदाम वराट ) – 
     कोरोनाचे अद्याप समुळ उच्चाटन झालेले नाही. अशातच  तालुक्यातील आरटीपीसीआर चे रिपोर्ट पाच – पाच दिवस येत नाहीत. खाजगी हॉस्पिटलमधे मोठ्या प्रमाणावर तपासणी होतात तेही आकडे प्रशासनाकडे येत नाहीत. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह ची संख्या जास्त असून, सुद्धा रेकॉर्डला कमी दिसत आहे. या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाच्या पातळीवर जमावबंदी सारखे धोरण आखणे गरजेचे असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी व्यक्त केले आहे.
    याबाबत सामाजिक कार्यकर्ते कोठारी यांनी प्रसिध्दीपत्रक काढले आहे.सध्या लाॅकडाऊन शिथिल केल्यामुळे सगळे व्यवहार चालू झाले असून, बाहेर गर्दी खूप वाढलेली आहे.  गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे कोठारी यांनी सांगितले आहे.
       ही बाब  कोठारी यांनी २० मार्च २०२१ रोजी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या निदर्शनास आणून दिली होती. गर्दी जास्त होत आहे यासाठी  उपाय योजना प्रशासनामार्फत कराव्यात.यावर तहसीलदार नाईकवाडे यांनी कोठारी यांच्या मागणीची दखल घेत तातडीने उपाययोजना केल्या होत्या. आज पुन्हा  उपाययोजना करण्याची वेळ आली आहे. आकडा वाढत चाललेला आहे. प्रशासनाने दिलेली वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी ९ असल्यामुळे कोरोना पॉजिटिव्ह वाढण्याचा प्रकार घडत आहे. यामध्ये वेळ कमी करून मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, सॅनिटायझर वापरणे अशा नियमाचे पालन करण्यास सांगणे गरजेचे झाले आहे. काही लोक उगाच फिरत असतात महत्त्वाचे काम असले तरच बाहेर पडावे अशा सूचना द्याव्यात याच माध्यमातून आपण कोरोनाचा अटकाव करू शकतो.   याबाबत जनतेने प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते  कोठारी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here