जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
दोन महिन्यांच्या लाॅकडाउन नंतर आता परत सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. पण अद्यापही कोरोना गेलेला नाही त्यामुळे नागरिक व व्यावसायिकांनी खास खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे हि खबरदारी घेतली तरच आपण कोरोना संसर्गापासून दूर राहू शकतो असे आवाहन
जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी केले आहे.
जामखेड शहरातील नागरीक व व्यावसायिकांना आवाहन मार्च २०२० पासून कोरोना विषाणूच्या महामारीचा प्रादुर्भाव सर्वत्र पसरत असून या महामारीच्या गंभीर परिणामांना सर्वांनाच सामोरे जावे. लागत आहे. सन २०२० मधील कोरोना विषाणुच्या पहिल्या लाटेचा फटका सर्वांनाच सहन करावा लागला माहे ऑक्टोंबर २०२० मध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आपण कोरोनाला हरविल्याचा भास सर्वांनाच झाला आणि यामुळेच ऑक्टोंबर २०२० नंतरचे सन, लग्न समारंभ, मित्र नातेवाईकांच्या गाठी – भेटी गर्दीच्या ठिकाणी पर्यटन, सामाजिक अंतर पाळणेबाबत गांभीर्याचा अभाव, मास्कचा वापर न करणे, वारंवार हात स्वच्छ न धुणे, इत्यादीमुळे कोरोना विषाणूने पुन्हा डोके वर काढले आणि माहे जानेवारी / फेब्रुवारी २०२१ पासून कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला. अशा प्रकारे कोरोना विषाणूच्या पहिल्या लाटेचा अनुभव असतानाही केवळ गांभीर्याच्या अभावामुळे अनेकांनी शासनाने ठरवून दिलेले नियम आणि स्वयंशिस्त पाळली नाही. पहिल्या लाटेतील अनुभवानुसार कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यास औषधोपचाराने बरे होता येते अशी अनेकांची धारणा होती. मात्र दुसऱ्या लाटेत परिस्थिती यापेक्षा अत्यंत निराळी असल्याचा अनुभव आपण सर्वांनी घेतला आहे.
दुसऱ्या लाटेत कोरोना विषाणूचा प्रसार अत्यंत वेगाने झाला तसेच त्याच्या प्रसाराबाबत, अंदाज लावणे कठीण जात होते. अनेक नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे त्यांनी उशिरा तपासणी केली. तसेच तज्ञ डॉक्टरांकडून उशिरा
उपचार घेणे सुरु केल्याने अनेक रुग्णांची परिस्थिती गंभीर झालेली होती. रुग्णाची प्रचंड मोठ्या प्रमाणावर
वाढती संख्या (महाराष्ट्रात पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत दैनंदिन सुमारे तिप्पट रुग्णसंख्या आढळून आली)
आणि त्यातही गंभीर रुग्णांचे मोठे प्रमाण यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण निर्माण झाल्याचे
सर्वानीच पहिले आहे. अत्यंत कठीण प्रसंग दुसऱ्या लाटेत सर्वांनी अनुभवला आहे.दुसऱ्या लाटेत मोठ्या संख्येने नागरीक मरण पावले. हे सर्व पाहताना मनाला होणाऱ्या वेदना आपण सर्वानीच कायमस्वरूपी स्मरणात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे असे वाटते. वाईट, दुखाचे क्षण विसरून आनंदी क्षणांची अनुभती घेतली पाहिजे असे सार्वत्रिक मत आहे.परंतु काही वाईट प्रसंग,क्षण, काळ आपण कधीच विसरता कामा नये.कारण असा वाईट काळ स्मरणात ठेवल्यास वाईट काळ प्रसंग,टाळण्यासाठी सर्वजन अधिक जबाबदारीने वागतील.त्यामुळे दुसऱ्या लाटेतील गंभीर परिस्थिती आपण स्मरणात ठेऊन यापुढे असा प्रसंग येऊ नये म्हणून शासनाने ठरून दिलेले नियम आणि स्वयंशिस्त सर्वानीच पाळणे आवश्यक आहे. दुसऱ्या लाटेतील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जरी काहीसा कमी झालेला असेल आणि शासनाकडून अनेक निर्बध उठविले असले तरीही आपल्याला यापुढे निष्काळजीपणाने वागणे
परवडणारे नाही.
काही तज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार यापुढील काळात तिसऱ्या लाटेचा धोका संभवतो.परंतु
तिसऱ्या लाटेचे गंभीर परिणाम टाळण्यासाठी नागरीक व्यावसायिक सर्वानीच काही निर्बध स्वतः होऊन पाळले
पाहिजेत.याचा फायदा यापुढील काळात होईल.जसे की कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात राहिल्यास आरोग्य यंत्रणेवर
ताण येणार नाही,प्रादुर्भाव नियंत्रणात राहिल्यास पुन्हा लॉकडाऊन करावे लागणार नाही आणि यामुळ सर्वांनाच
आपआपले दैनदिन व्यवहार नियमांचे पालन करून पार पाडता येतील.
एक गोष्ट पक्की ध्यानात ठेवणे गरजेचे आहे,ती म्हणजे कोरोना विषाणूला हरविण्यासाठी आणि आपल्या नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी सर्वानीच जबाबदारी आणि गांभीर्याने वागणे अत्यंत गरजेचे आहे. व्यावसायिकांना माझे एक आवाहन आहे कि, सर्वांनी आपआपल्या संघटनांनमार्फत स्वयंशिस्तीबाबत
नियामावली तयार करून त्याची अंमलबजावणी स्वतः हून करावी. “कोरोनाला टाळून टाळेबंदी टाळावी.”
असे आवाहन मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी केले आहे.