मराठा आरक्षणासाठी जामखेड तालुक्यात साखळी उपोषण सुरु करणार – मंगेश आजबे मनोज जरांगे यांची भेट घेत जामखेड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने पाठिंबा

0
127

जामखेड न्युज——

मराठा आरक्षणासाठी जामखेड तालुक्यात साखळी उपोषण सुरु करणार – मंगेश आजबे

मनोज जरांगे यांची भेट घेत जामखेड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने पाठिंबा

 

गेल्या पंधरा दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसले त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यातून अनेक लोक येत आहेत. आणी आपला पाठिंबा दर्शवत आहेत. जामखेड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने मंगेश आजबे यांनी पाठिंब्याने पत्र देत जामखेड तालुक्यात साखळी उपोषण सुरु करणार असल्याचे सांगितले.


अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील उपोषणास बसले त्यांना पाठिंबा व मराठा आरक्षणासाठी संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून, राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत. महाराष्ट्रातुन देखील जरांगे पाटील यांना भेटुन पाठींबा देण्यासाठी हजारो मराठा बांधव अंतरवाली सराटी गावात येत आहेत.

दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठींबा देण्यासाठी दि १२ रोजी सकल मराठा समाजाच्याचे मंगेश (दादा) आजबे यांच्या वतीने अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांची भेट घेऊन व निवेदन देऊन पाठींबा दिला. तसेच मनोज जरांगे यांचे उपोषण व आंदोलन संपले नाहीतर उद्या पासून जामखेड तालुक्यातील प्रत्येक गावात व जामखेड शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करणार आहेत आशी माहिती मंगेश दादा आजबे यांनी दिली.

निवेदन देता वेळी अंतरवाली सराटी या ठिकाणी सकल मराठा समाजाचे मंगेश (दादा ) आजबे, बावीचे सरपंच निलेश पवार, सुंदरदास बिरंगळ, अनिल भिसे व अविनाश बोधले उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here