जामखेड न्युज——
खरी गुणवत्ता जिल्हा परिषद शाळेतच -नानासाहेब उगले
उगलेवस्ती नायगाव जिल्हा परिषद शाळेत आदर्शचा सत्कार समारंभ संपन्न
खाजगी संस्थेच्या तुलनेत खरी गुणवत्ता जिल्हा परिषद शाळेत आहे अनेक गुणवत्ता धारक जिल्हा परिषद शाळेतच घडले आहेत. त्यामुळे सरकारने जिल्हा परिषद शाळेकडे लक्ष देऊन अधिक सुविधा पुरवाव्यात असे मत माजी कृषी अधिकारी नानासाहेब उगले यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक, जिल्हा परिषद अहमदनगर जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच शिक्षक समितिचे तालुका कार्याध्यक्ष अशा आदर्श व्यक्तींचा उगलेवस्ती नायगाव जिल्हा परिषद शाळेत सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नानासाहेब उगले (माजी कृषी अधिकारी), नायगांवचे उपसरपंच संजय उगले, शाळा व्यवस्थापन समितिचे अध्यक्ष सुरेश उगले, शिवाजी उगले, विवेक उगले, सतेवाडी शाळेचे मुख्याध्यापक राजीव मड़के, वणवेवस्ती शाळेचे मुख्याध्यापक नितिन जाधव, उगलेवस्ती शाळेचे मुख्याध्यापक केशवराज कोल्हे, सहशिक्षक अरुण मुरुमकर,अंगणवाडी सेविका सौ. शिंदे मॅडम, सौ. उगले मॅडम आदि उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्याध्यापक केशव कोल्हे म्हणाले की, काही व्यक्तीच अशा असतात की ज्यांना एखादा पुरस्कार जाहीर झाला तर तो पुरस्कार सुद्धा सह्याद्रीच्या उंचीसारखा भासतो. पुरस्कारामुळे त्यांची जबाबदारी अधिक वाढलेली आहे. असे फारच कमी लोक असतात ज्यांच्याकडे दुसऱ्यांना प्रेरणा देण्यासारख्या गोष्टी असतात म्हणूनच आपण या आदर्शचा सत्कार करत आहोत.
यामध्ये महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त लक्ष्मीकांत ईडलवार
तसेच
अहमदनगर जिल्हा परिषदचा जिल्हास्तर आदर्श पुरस्कार प्राप्त एकनाथ (दादा) चव्हाण
तसेच
तसेच शिक्षक समितिचे तालुका कार्याध्यक्ष पद मिळाल्याबद्द्ल श्री अरुण मुरुमकर यांचा
मान्यवरंच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता
यावेळी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली