जामखेड न्युज——
धनगर आरक्षणप्रश्री निर्दयी सरकार जाणीवपुर्वक दुर्लक्ष करतय -खासदार सुप्रिया सुळे
धनगर आरक्षणप्रश्र संसदेत मांडु
धनगर आरक्षणप्रश्री चौंडीत चालु असलेल्या आंदोलनाकडे आज सहाव्या दिवशीही सरकार दुर्लक्ष करत असून, हे सरकार निर्दयी सरकार असल्याचेच यातून दिसून येत असल्याचे राष्टवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगत, संसदेच्या विशेष अधिवेशनात इंडिया आघाडीच्या वतीने धनगर आरक्षणप्रश्री आवाज उठवला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी रात्री साडेआठ वाजता चोंडीत येवून धनगर आरक्षणप्रश्री उपोषणास बसलेल्या आंदोलकांची भेट घेवुन चर्चा केली. यावेळी खा.सुळे यांनी तब्बल एक तास आंदोलकांशी चर्चा केली. यादरम्यान आमदार रोहित पवार हेही आंदोलनस्थळी आले. यावेळी महाविकास आघाडीच्या मुंबईत चालु असलेल्या बैठकीत धनगर आरक्षणाचा विषय चर्चेत घेण्याबाबत खा सुळे यांनी महाविकास आघाडीचे नेते राजेश टोपे यांच्याशी दुरध्वनीवर चर्चा केली. तर आमदार रोहित पवार यांनी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांचेशी फोनवर चर्चा करून, आंदोलकांनी प्रकृती खालावली असल्याने, शासनाने या आंदोलनाची दखल घेण्याबाबत कळवावे असे सांगितले. यावेळी अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज अक्षय शिंदे, माजी मंत्री व यशवंत सेनेचे बाळासाहेब दोडतले, माणिकराव दांगडे, रूपनवर तसेच अनेक समाजबांधव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी धनगर आरक्षणप्रश्री खा सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवण्याबरोबरच ट्विट करून लक्ष वेधणार असल्याचे सांगितले. गेली सहा दिवसापासून आमरण उपोषण चालु असतानाही सरकारमधील जिल्ह्याचे पालकमंत्री किंवा अन्य कोणीही मंत्री आंदोलकांकडे फिरकला नसल्याबाबत खा.सुळे यांनी आश्चर्य व्यक्त करत,याबाबत जाब विचारला जाणार असल्याचे सांगितले.
चौकट –
धनगर आरक्षणप्रश्री भाजपाने भूमिका स्पष्ट करावी.
——————————————
भाजपा सरकार राज्यात एक आणि केंद्रात वेगळीच भूमिका घेताना दिसत आहे. संसदेत धनगर आरक्षणाचा प्रश्र मांडला तर भाजपाचेच खासदार आरक्षण देण्यास विरोध करतात. त्यामुळे धनगर आरक्षणप्रश्री भाजपाने भूमिका स्पष्ट करावी.असेही आवाहन खा. सुळे यांनी यावेळी केले.
चौकट –
उपोषण मागे घेण्याबाबत खा.सुळे यांनी आंदोलकांना विनंती केली. मात्र उपोषणकर्ते बाळासाहेब दोडतले , अण्णासाहेब रूपनवर आणि सुरेश बंडगर यांनी जोपर्यंत धनगर आरक्षणाचा वटहूकुम निघत नाही.तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाहीत आणि वैद्यकिय उपचारही घेणार नसल्याचे सांगीतले.
चौकट –
राजपत्राची प्रत खा.सुप्रिया सुळेंना दिली.
———————————————
केंद्र आणि राज्य सरकारच्या राजपत्रात ३६ क्रमांकावर धनगर समाजाला अनुसुचीत जमातीचे आरक्षण असल्याचा उल्लेख आहे. हे राजपत्राची प्रत यावेळी आंदोलकांनी खा.सुळेंना दिली.