रयतचे दादा पाटील महाविद्यालय देशात सहावे तर राज्यात तिसरे दादा पाटील महाविद्यालयाला NAAC मानांकनात A++ ग्रेड प्राप्त महिला कुस्ती स्पर्धा, बालकुमार साहित्य संमेलन ई. आयोजनाचा मोठ्या प्रमाणात फायदा

0
127

जामखेड न्युज——

रयतचे दादा पाटील महाविद्यालय देशात सहावे तर राज्यात तिसरे

दादा पाटील महाविद्यालयाला NAAC मानांकनात A++ ग्रेड प्राप्त

महिला कुस्ती स्पर्धा, बालकुमार साहित्य संमेलन ई. आयोजनाचा मोठ्या प्रमाणात फायदा

कर्जत शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयाला नॅक मानांकनात ए++ ग्रेड मिळाल्याने कर्जतच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. दादा पाटील महाविद्यालयात NAAC कडून उत्तराखंड, केरळ व हरियाणा येथून तपासणीसाठी चेअरमन आले होते. यावेळी आलेल्या तपासणीस यांनी महाविद्यालयाच्या शारदाबाई पवार सभागृहाची पाहणी केली यावेळी त्यांनी नोंद करत असताना अशा प्रकारचे अत्याधुनिक व सुसज्ज सभागृह यापूर्वी कोणत्याही महाविद्यालयात पाहायला मिळाले नाही असे नमूद केले. तसेच मानांकनातील एकूण ४ पैकी ३.७१ CGPA प्राप्त करत दादा पाटील महाविद्यालय हे देशातील ६ महाविद्यालयांपैकी एक तर राज्यातील तीन महाविद्यालयांपैकी एक ठरले आहे. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात केवळ एकमेव दादा पाटील महाविद्यालय असे आहे ज्यांनी नॅकमध्ये ३.७१ गुण प्राप्त करत ए++ ग्रेड प्राप्त केला आहे.


दादा पाटील महाविद्यालयात अभ्यासाबरोबरच विविध अभ्यासेतर उपक्रम राबवण्यात आले. त्यामध्ये महाविद्यालयाला पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. अभ्यासेतर उपक्रमामध्ये विविध सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात आलेले उपक्रम आणि विशेषतः आमदार रोहित पवार यांच्या विशेष प्रयत्नातून आयोजीत करण्यात आलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ महिला कुस्ती स्पर्धा आणि अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलन यांचा मौलिक वाटा आहे. यासोबतच महाविद्यालयातील मुलींसाठी सुरू करण्यात आलेल्या तेजस्विनी बससेवेची देखील दखल यावेळी तपासणी करत असताना घेण्यात आली. या बससेवेमुळे सुरक्षेच्या व इतर कारणास्तव मुलींना महाविद्यालयात न पाठवणारे आई-वडील देखील त्यांना शिक्षणासाठी महाविद्यालयात पाठवण्यास तयार झाले. अशा पद्धतीने अनेक मुली या शैक्षणिक प्रवाहात आल्या त्याची देखील नोंद यावेळी घेण्यात आली.

दरम्यान, महाविद्यालयात असलेली अत्याधुनिक RO सिस्टीम, हिरवळ, सोलार एनर्जी, विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहे इत्यादी सर्व बाबींमध्ये महाविद्यालय हे सर्वोत्कृष्ट ठरले आहे. बरोबरच महाविद्यालय हे विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी देखील प्रयत्न करते आणि कमवा आणि शिका हा उपक्रम देखील राबवला जातो आणि यामध्ये विद्यार्थ्यांचा देखील सक्रिय असा सहभाग पाहायला मिळाला. नॅकतर्फे या सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास करण्यात आला व त्यानुसारच दादा पाटील महाविद्यालयाला ए++ असे ग्रेड देऊन गौरवीत करण्यात आले आहे.

प्रतिक्रीया –

“रयतचे दादा पाटील महाविद्यालयाने NAAC मानांकनात A++ ग्रेड मिळवला ही प्रत्येक कर्जतकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आपण दादा पाटील महाविद्यालयात विविध उपक्रम जसे की, अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धा, अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलन, रयत वॉश प्रोग्राम इत्यादी महत्त्वाचे उपक्रम राबवले आणि त्याचा फायदा हा NAAC मानांकनात झाला याचा लोकप्रतिनिधी म्हणून मनापासून आनंद वाटतो. रयत शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच शिक्षक विद्यार्थी आणि विशेषतः याचं श्रेय हे प्राचार्य नगरकर सरांचं आहे. सर्व प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी यांचं मनापासून अभिनंदन! कर्जत जामखेड मतदारसंघात आम्ही शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी कायमच प्रयत्न करत असतो आणि यापुढेही करत राहू!”

– आमदार रोहित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here