जामखेड न्युज——
प्राचार्य आप्पासाहेब शिरसाट यांनी पूर्ण केली कठीण अशी लडाख मॅरेथाॅन.
जगातील सर्वात कठीण समजली जाणारी आतंरराष्ट्रीय खरदूंग मॅरेथॉन स्पर्धा अत्यंत कमी आँक्सिजन प्रमाण असणाऱ्या ठिकाणी ११.२ किलोमीटरची रनिंग स्पर्धा जामखेडचे धावपटू प्राचार्य आप्पासाहेब शिरसाट यांनी निर्धारित वेळेआधी पूर्ण केली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या आगोदरही अनेक स्पर्धा त्यांनी यशस्वी केल्या आहेत.
जगातील सर्वात उंच 11700 ते17500 फूट उंचीवर विश्वातील प्रसिद्ध स्पर्धा आहे. या स्पर्धेत देशभरातील तसेच विदेशातील हजारो स्पर्धक भाग घेतात. या स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यातून 1)डाॅ. पांडूरंग सानप 72किमी 2)प्राचार्य आप्पासाहेब शिरसाट11200 मीटर (11.2 किमी)यांनी भाग घेतला होता.
डाॅ. सानप यांचे नेतृत्वाखाली आप्पाहेब शिरसाट यांनी हि स्पर्धा विक्रमी 1तास 28मी या वेळेत पूर्ण करून 1000 धावपटूंमध्ये 97 वी रॅक म्हणजे प्रथम 100मध्ये येण्याचा मान मिळवला.
या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी सरांना ल ना होशिंग विद्यालयाचे माजी प्राचार्य आणि क्रिडा शिक्षक अनंता खेत्रे यांचे मार्गदर्शन आणि मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष दशरथ कोपनर, उपाध्यक्ष दत्ता काळे अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सुनिल पंडीत सर आणि भगवान बाबा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री. ज्ञानदेव बांगर सर अध्यक्ष श्री. देविचंदशेठ डोंगरे यांचे सहकार्य लाभले.