जामखेड न्युज——
जगातील सर्वात कठीण आंतरराष्ट्रीय खरदूंग मॅरेथॉन स्पर्धा डॉ पांडुरंग सानप यांनी वेळेआधीच केली पुर्ण!!
जगातील सर्वात कठीण समजली जाणारी आतंरराष्ट्रीय खरदूंग मॅरेथॉन स्पर्धा अत्यंत कमी आँक्सिजन प्रमाण असणाऱ्या ठिकाणी ७२ किलोमीटर ची रनिंग स्पर्धा जामखेडचे धावपटू डॉ. पांडुरंग सानप यांनी निर्धारित वेळेमध्ये १४ तासाच्या आत पूर्ण केली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या आगोदरही अनेक स्पर्धा त्यांनी यशस्वी केल्या आहेत.
डॉक्टर सानप यांनी लडाख येथील अतिउंच व अवघड अशी खरदुंगला चॅलेंज मॅरेथॉन 8 सप्टेंबर 2023 रोजी लडाख येथील अति उंच अशा 17 600 फूट व कमी ऑक्सिजन असलेल्या ठिकाणी 72 किलोमीटरची लडाख येथील खरदुंगला चॅलेंज मॅरेथॉन त्यांनी वेळेआधी पूर्ण केली या स्पर्धेमध्ये जगभरातून 259 लोक स्पर्धक आले होते त्यापैकी तीन स्पर्धक गैरहजर होते. तर तर ५७ स्पर्धकांनी माघार घेतली १९९ स्पर्धक सहभागी झाले होते.
तिथे कमी ऑक्सिजनमुळे धावणे अशक्य होत होते आणि 14 तासांमध्ये हे अंतर पूर्ण करायचे होते पण ऑक्सिजनवर कमी असल्यामुळे हे करणे बऱ्याच जणाला शक्य झाले नाही जगभरातून आलेल्या सर्व स्पर्धकांपैकी डॉक्टर सानप यांनी स्पर्धा अत्यंत निर्धारित वेळेमध्ये पूर्ण केली त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जामखेड येथील धावपटू डॉ. पांडुरंग सानप यांनी आतापर्यंत दोन वेळा आयर्न मॅन स्पर्धा, पाच वेळेस 50 किलोमीटरची मॅरेथॉन, सहा वेळेस 42 किलोमीटरची मॅरेथॉन, आणि दहा ते पंधरा वेळेस 21 किलोमीटरच्या मॅरेथॉन, या आणि अशा अनेक स्पर्धांमधून भाग घेतलेला होता.
खरदूंग मॅरेथॉन कॉलिफिकेशन चाचणी ही फार अवघड असते त्या सर्वांचाचणीमधून डॉ. सानप हे यशस्वीरित्या पार पडलेले आहेत. त्यामुळे त्यांची
या स्पर्धेत निवड करण्यात आलेली आहे.
येथील ऑक्सिजनचे प्रमाण 60 ते 70 टक्केच असते बाकी इतर जगामध्ये कुठे गेले तरी 98, 99 टक्के शंभर टक्के ऑक्सिजन असतो, याच ठिकाणी फक्त ऑक्सिजन लेव्हल कमी असते. ते पण जास्त उंचीवर असल्यामुळे आणि ही जगातील सर्वात अवघड अशी स्पर्धा आहे. यासाठी जामखेड करांच्या वतीने डॉ सानप यांनी पुर्ण केली आहे.
चौकट
जामखेड न्यूजशी बोलताना डॉ. सानप म्हणाले की, जामखेड करांचा आशीर्वाद मिळाल्यामुळे जगातील सर्वात कठीण समजली जाणारी खरदूंग आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा मी पूर्ण केली आहे.