जामखेड न्युज——
उपक्रमशील व विद्यार्थीप्रिय एकनाथ चव्हाण यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर –
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे
जामखेड -तालूक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बसरवाडी ता. जामखेड येथील उपक्रमशिल , विद्यार्थीप्रिय ,समाजप्रिय ,कर्तव्यदक्ष शिक्षक श्री . एकनाथ पंढरीनाथ चव्हाण यांना अहमदनगर जिल्हा परिषदेचा सन २० २२- २०२३ चा जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे .त्या बददल जामखेड तालुक्यातील शिक्षकांच्या व प्रशासनाच्या वतीने गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी अभिनंदन केले आहे .
याआधीही बसरवाडी शाळेला स्वच्छ व सुंदर शाळा पुरस्कार मिळालेला आहे. तसेच ही शाळा जिह्यातील पहिली आय एस ओ मानांकन प्राप्त झालेली शाळा आहे. एका चांगल्या शिक्षकाचा सन्मान झाल्याने त्यांनी केलेल्या कामाची प्रेरणा इतर शिक्षकांना नक्की मिळेल.
त्यांना जिल्हा शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, शिक्षण विस्तार अधिकारी सुनिल जाधव, त्र्यंबके, शिक्षक बँकेचे संचालक संतोष राऊत, केंद्रप्रमुख राम निकम, नारायण राऊत, ‘केशव गायकवाड, बाळासाहेब कुमटकर, सुरेश मोहिते, संतोष वांढेकर, रामदास गंभीरे, घोडके, पारखे, सुनिल महामुद्रे, बाळासाहेब गांगर्डे, नरवणे, श्रीम. ससाणे श्रीम. कात्रजकर, श्री. निमसे पाटील , सर्व विषय तज्ञ व साधन व्यक्ति यांनी अभिनंदन केले आहे.