एकनाथ चव्हाण सरांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर पहिली आयएसओ तसेच स्वच्छ शाळा म्हणून प्रथम पुरस्कार घेणाऱ्या बसरवाडीच्या शिक्षकांचा आदर्श शिक्षक म्हणून सन्मान

0
199

जामखेड न्युज——

एकनाथ चव्हाण सरांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

पहिली आयएसओ तसेच स्वच्छ शाळा म्हणून प्रथम पुरस्कार घेणाऱ्या बसरवाडीच्या शिक्षकांचा आदर्श शिक्षक म्हणून सन्मान

 

अहमदनगर जिल्ह्यातील पहिल्या आयएसओ मानांकन प्राप्त जिल्हा परिषद बसरवाडी तसेच
स्वच्छ शाळा सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त शाळेचे उपक्रमशील कर्तव्यदक्ष समाजाभिमुख विद्यार्थी प्रिय शिक्षक एकनाथ पंढरीनाथचव्हाण (दादा) यांना शासनाचा आदर्श जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याने चव्हाण सरांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

जामखेड तालुक्यातील पहिली आयएसओ आदर्श शाळा, जिल्ह्यात प्रथम क्रमांकाच्या शाळेने राज्यातही स्वच्छ विद्यालय म्हणून प्रथम क्रमांक पटकावला होता. चव्हाण सरांनी शाळेत हजर झाल्यापासून विद्यार्थी हितासाठी झपाटून काम केले जिल्ह्यात पहिली आयएसओ मानांकन प्राप्त केले. तसेच स्वच्छ सुंदर शाळा पुरस्कार मिळवला बसरवाडी शाळेचा आदर्श घेऊन चव्हाण सरांच्या मदतीने तालुक्यातील अनेक शाळा आयएसओ झाल्या. आता शासनाने चव्हाण सरांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला आहे.


बालाघाटाच्या डोंगरातील एक वाडी,100% ऊसतोड मजूर असणारे ग्रामस्थ यांची शाळा महाराष्ट्रात प्रथम येते. हि गोष्ट महाराष्द्रातील प्रत्येक तांडा, पाडा, वस्ती, वाडी, गाव यांच्यासाठी आत्मविश्वास देणारी आहे.बसरवाडी येवू शकते तर माझी शाळा का नाही? याच धर्तीवर अनेक शाळा आयएसओ झाल्या

 

जामखेड शिक्षणाचा दिपस्तंभ जि.प.प्राथ.शाळा बसरवाडी

मनापासून काम केलं की मनातलं काम होतं. साखर कारखाण्यावर ऊस तोडण्यासाठी जाणारा 100%पालक वर्ग आणि त्या पालकांनी शिक्षकांच्या मदततीने शाळेचा कायापालट केला. आणि भारत सरकारच्या स्वच्छ विद्यालय पुरस्कारात शाळा राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाली. हे काम करणाऱ्या शिक्षकाचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान केला आहे.

जामखेडपासून 13 कि.मी. वर ग्रामपंचायत शिऊर मधील एक छोटीशी वाडी होय. लोकवस्तीतील 75 ते 100 घरे आणि तेही 6 महिन्यासाठी पोटापाण्यासाठी स्थलांतरीत होणारी कुटुंबे, कुटुंबे स्थलांतरीत झाली की गावात फक्त म्हतारी माणसे राहतात. लहान पाचवी पर्यंतची मुले पालकाबरोबर स्थलांतरीत होत होती. 12 जुलै 2012 रोजी बीड जिल्ह्यात नोकरीस असलेला त्याच गावातील शिक्षक एकनाथ पंढरीनाथ चव्हाण जिल्हा बदलीने बसरवाडीत हजर झाले. संतोष डोके या सहकार्याला बरोबर घेवून नोव्हेबर मध्ये होणारे बेलापूरचे विद्यार्थ्यांचे 100% स्थलांतर रोखले.

आजी-आजोबा, शेजारी,नातेवाईक,प्रसंगी स्वतःच्या घरी मुले त्यांनी संभाळली. स्वतःच्या घरी मुले शिक्षक ठेवून घेतायत म्हटल्यावर पालकात सकारात्मक परीणाम झाला.100% पट नोंदणी,100%उपस्थिती आणि दर्जेदार शिक्षण यावर शिक्षकांचे काम सुरू झाले. पण पालक वर्ग काही शाळेकडे येत नव्हता. पण एक दिवस चमत्कार झाला. जूनला शाळा सुरू झाल्यावर केशव हराळे सर व एकनाथ चव्हाण सर यांनी हातात प्लास्टिक पिशव्या बांधून शौचालय व मुताऱ्या साफ केल्या. हि बातमी वाऱ्यासारखी वाडीत पसरली.दुस-यादिवशी सगळी वाडी शाळेत जमा झाली. असली साफसफाई आम्ही करू हे गावकऱ्यांनी शिक्षकांना ठणकावून सांगितले. तेथेच प्रेमाचा सेतु सुरू झाला. आणि आज पर्यंत तो टिकून आहे. पुढील वर्षी हि शाळा तालुक्यातील पहिली व अहमदनगर जिल्ह्यातील तिसरी ISO शाळा बसर वाडी झाली.बसरवाडीमुळे जामखेड तालुक्यात शिक्षण क्रांतीला सुरूवात झाली आणि तालुक्यातील 100 शाळा ISO मानांकन प्राप्त झाल्या. हा महाराष्ट्रातील वेगळा पॅटर्न होता.

शिक्षकामुळे अनेक शाळा सुधारलेल्या आपण ऐकून आहोत. एक शाळा सुधारायची, तेथील पट वाढायचा आणि आसपासच्या शाळा ओस पडायच्या त्यामुळेच बसरवाडी हा वेगळा पॅटर्न ठरला.जामखेड तालुक्यातील साठ सत्तर शाळानी विधार्थी पालकासह बसर वाडी शाळेला भेटी दिल्या. तेथून प्रेरणा घेवून आपली शाळाही बसरवाडीसारखीच बनवायची असा संकल्प करून तो पूर्ण केला. बऱ्याच शाळांना बसरवाडीचे एकनाथ चव्हाण सरांना बोलावून पालक सभेचे आयोजन केले.मुकुंदराज सातपुते सर व एकनाथ चव्हाण सर यांनी त्यांच्या कौशल्याने सांस्कृतीक कार्यक्रमातून तालुक्यातील शाळांना निधी उभा केला.गावागावात शैक्षणिक जागृती निर्माण झाली.

मीच माझा शिक्षक

कोविड काळात सर्वत्र शिक्षण बंद होते. बसरवाडीत सुशिक्षित तरुणांनी मंदिरात कोरोनाचे सर्व नियम पाळत मुलांचे शिक्षण चालू ठेवले.

डिजिटल शाळा

डॉ. इंद्रकुमार भिसे यांनी मा.पं.सं. बबनराव देवकाते यांच्या मार्फत लॅप टॉप व प्रोजेक्टर शाळेला भेट
मा.आ. रोहित पवार यांनी इन्ट्राक्टिव पॅनल भेट दिले

क्रिडा साहित्य

आमदार रोहित पवार यांच्याकडून क्रिडा साहित्य भेट
मा.सभापती भगवान मुरुमकर यांच्या कडून शाळा खोली निधी व कॉक्रिट रस्ता

मा. मंत्री राम शिंदे साहेब यांनी शाळेला भेट व वाडीला डांबर रस्ता केला.

ग्रामपंचायत शिऊर कडून वेळोवेळी मदत
या सर्वच गोष्टी शालेय व्यवस्थापन समितीचे पाठबळ, पालकांचा पाठिंबा यामुळे हि शाळा स्वच्छ विद्यालय पुरस्कारात महाराष्ट्रात प्रथम आली. आता हे सर्व करणाऱ्या शिक्षकाचा सन्मान करण्यात आला आहे.

बसरवाडीचा चढता आलेख

1)सन 2013-14 तालुक्यातील आदर्श शाळा पुरस्कार

2) 5सप्टेंबर 2014 रोजी याच शाळेवरील केशव हराळे सर यांना जिल्हा परीषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त

3) सन 2014-15 जिल्ह्यातील तिसरी व जामखेड तालुक्यातील पहिली ISO मानांकन प्राप्त शाळा

4) सन 2015-16 मध्ये या शाळेची प्रेरणा घेवून जामखेड तालुक्यातील 100 शाळेला ISO मानांकन प्राप्त शाळा

5)सन 2015-16 ग्रामिण जिल्हा गुणवत्ता मध्ये अहमदनगर जिल्ह्यात द्वितीय कमांक

6) सन 2016-17 स्वच्छ विद्यालय फायनल सलेक्शन लिस्ट मध्ये प्रथम क्रमांक

7) सन 2020-21 कोविड काळात उत्कृष्ट कार्य,शिष्यवृत्ती जिल्हा गुणवत्ता यादीत दोन विद्यार्थी व नवोदय साठी एक विद्यार्थी निवड म्हणून पं.स. जामखेड कडून सन्मान

8) सन 2021-22 स्वच्छा विद्यालय पुरस्कार जिल्हयात पाच विभागात प्रथम CEO आशिष येरेकर साहेब यांच्याकडून सन्मान

9) सन2021-22 स्वच्छ विद्यालय पुरस्कार राज्यात प्रथम पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून सन्मान

10) एकनाथ चव्हाण सरांना जिल्हा परिषदेचा 2023- 24 चा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

शाळेचे उत्कृष्ट उपक्रम

1)सप्तरंगी परिपाठ
2) उपस्थिती ध्वज
3) मिनि बँक
4)वाचाल तर वाचाल ( ग्रथालय )
5) माझा गाव माझा अभिमान शाळा आमची शान
6) चालता बोलता ( प्रश्न मंजूषा)
7) दिनांक तोच पाढा
8) मी इंग्रजी बोलणार
9) मी सुंदर होणार
10) प्राणीमात्राचे संगोपन
11) झाडे लावा,झाडे जगवा
12)महापुरूषांची जयंती, पुण्यस्मरण
13) स्वच्छ पो.आहार
14) वर्गसजावट
15) संगणक
16) दप्तरमुक्त शाळा
16) ऑक्सिजन भेट
17) सहल
18) परिसर भेट
19)मुलाखत
20)भाजीपाला बाग
21)निसर्ग शाळा
22)नकाशा वाचन
23)कारागिरी
24)विविध गुणदर्शन
25)सांस्कृतीक कार्यक्रम
याशिवाय दैनदिन शिष्यवृती व नवोदय जादा तास असे विविध उपकम शाळा राबवते.

शाळेला भेटी
CEO शैलेशजी नवाल साहेब, शिक्षणाधिकारी अशोक कडूस,तत्कालीन पालक मंत्री राम शिंदे साहेब

समाजाचा सहभाग
सन 2012 पासून आजपर्यंत बारा-तेरा लाखाचा सभाजाचा सहभाग

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here