जनविकास सेवाभावी संस्थेच्या वतीने पोलीसांना रक्षाबंधन

0
95

जामखेड न्युज——

जनविकास सेवाभावी संस्थेच्या वतीने पोलीसांना रक्षाबंधन

अन्याय अत्याचार, दुष्कृत्य करणाऱ्यांना शासन करण्यासाठी कार्यरत पोलीस बांधवां बद्धल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जनविकास सेवाभावी संस्थेच्या वतीने पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधन सण साजरा केला. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

भारतीय संस्कृतीमध्ये रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणीच्या पवित्र अशा प्रेमाचा सण आहे. आज कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सदैव कार्यरत असलेले पोलीस बांधव आपल्या बहिणीकडे जाऊ शकत नाहीत. ही अडचण लक्षात घेऊन जनविकास सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मी पवार यांनी पोलीस स्टेशनमध्ये हा स्तुत्य उपक्रम राबविला.

यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती सह अनेक पोलीस बांधव उपस्थित होते.

पोलिसांना रक्षाबंधन करताना जनविकास सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मी पवार, निशा पवार, मीरा तंटक, नंदा शेगर, राणी भोसले यांच्या सह अनेक भगिनी उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here