जामखेड न्युज——
आजच्या युगात डिजिटल शिक्षण महत्त्वाचे – प्रा. लक्ष्मण पवार.
आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या काळात पारंपरिक शिक्षणाऐवजी डिजिटल शिक्षण महत्त्वाचे आहे. योग्य पद्धतीने डिजिटल शिक्षण घेतले तर विद्यार्थी स्पर्धेच्या युगात कोठेही कमी पडणार नाहीत म्हणून आजच्या युगात डिजिटल शिक्षण महत्त्वाचे आहे असे मत प्रा. लक्ष्मण पवार यांनी व्यक्त केले.
दि.2 सप्टेंबर रोजी भगवान बाबा शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रदिपकुमार महादेव बांगर माध्यमिक व देविचंद वामनराव डोंगरे ऊच्च माध्यमिक विद्यालय मोहा येथे डिजिटल एज्युकेशन परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष देविचंद डोंगरे, सचिव ज्ञानदेव बांगर, संचालक रामचंद्र दहिफळे, त्रिंबक डोंगरे, प्राचार्य आप्पा शिरसाठ सह सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी ऊपस्थित होते.
प्रा.लक्ष्मणराव पवार यांनी शालेय शिक्षणात डिजिटल एज्युकेशन किती महत्वाचे आणि उपयुक्त आहे. याबद्दल खुप महत्वपुर्ण माहिती सांगितली. अभ्यासाच्या विविध पद्धती; अभ्यासाच्या सवयी; अभ्यासाची तंत्रे याविषयी खुप चांगले मार्गदर्शन केले. तसेच डिजिटल एज्युकेशन चे समन्वयक अशोक लाड यांनी महत्वाची माहिती सांगितली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागरगोजे सर यांनी केले आणि आभार मा.प्राचार्य शिरसाठ सर यांनी केले.कार्यक्रम उत्साहात संप्पन झाला.