जामखेड न्युज——
राजाभाऊ मुरूमकर यांचे कार्य कौतुकास्पद – वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके
राजाभाऊ मुरूमकर यांचे बोलणे कमी व काम जास्त – डॉ. भगवान मुरूमकर
राजाभाऊ मुरूमकर यांनी इमाने इतबारे वनविभागात सेवा केली कधीच कसलीही तक्रार नाही. नेहमी हसतमुख असणारे मुरूमकर यांनी परिसर हरित करण्यासाठी खुप परिश्रम घेतले. त्यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे असे वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांनी सेवापुर्ती कार्यक्रमात मत व्यक्त केले.
वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय कर्जत जामखेड मधील कर्मचारी राजाभाऊ किसन मुरूमकर यांचा सेवा पुर्ती कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष कर्जत जामखेड वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके तर प्रमुख पाहुणे जामखेड तालुक्याचे सामाजिक कार्यकर्ते व पक्षी प्राणी मित्र संजय कोठारी, पंचायत समितीचे माजी सभापती भगवान मुरूमकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सोमनाथ पाचारणे व जामखेड तालुक्याचे वन परिमंडल अधिकारी राजेंद्र भोसले, मयूर भोसले, उद्योजक अरुण लटके सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले राजाभाऊ मुरूमकर यांनी वन विभागात ३८ वर्षे सेवा केली आम्ही कित्येक वर्षापासून वृक्षारोपण वनविभागाच्या सहकार्याने कार्यक्रम घेतो राजेंद्र मुरूमकर हे नेहमी आम्हाला मदत करत असतात त्यांचा आज सेवापुर्ती कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमास मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवून चांगल्या माणसाचा सत्कार करण्याचा योग आला तसेच वन रक्षक प्रवीण उबाळे वन मजूर ताहेरआली सय्यद आणि सर्व कर्मचारी यांचे आम्हाला खूप सहकार्य होते.
तसेच यावेळी बोलताना माजी सभापती भगवान मुरूमकर म्हणाले राजाभाऊ मुरूमकर हा माझ्या गावाचा माणूस शांत स्वभावाचा आणि बोलणे कमी आणि काम जास्त असा हा माणूस आज त्याचा सेवापूर्ती समारोह करण्यात आला खरोखर राजाभाऊंनी काम चांगले केले याचे मला कौतुक आहे यापुढेही त्याच्या हातून चांगले काम घडो अशी मी अशा व्यक्त करतो
कार्यक्रमाच्या वेळी वनरक्षक सुरेश भोसले, आजिनाथ भोसले, प्रदीप उबाळे, रवी राठोड, वनसेवक ताहेरआली सय्यद, शिवाजी चिलगर, शामराव डोंगरे ,शहाजी नेरकर ,राघू सुरवसे, बबन महानोर, संजय अडसूळ, हरिचंद्र माळशिकारे, भाऊसाहेब भोगल, रामकृष्ण लहाने,बोबडे व इतर कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते