आष्टीतील राधिका लॉजवरील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश!!! जामखेड परिसरातील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश कधी होणार ?

0
422

जामखेड न्युज——

आष्टीतील राधिका लॉजवरील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश!!!

जामखेड परिसरातील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश कधी होणार ?

 

जामखेड नगर रोडवरील आष्टी तहसील कार्यालयाजवळील राधिका लॉजवर राजरोसपणे सुरु असलेल्या वेश्या व्यवसायचा आष्टी पोलिसांनी पर्दाफाश केला असून या प्रकरणी दोन महिलांची सुटका केली आहे. जामखेड परिसरातही लाँजवर मोठ्या प्रमाणात वेश्याव्यवसाय राजरोसपणे चालत आहे. याचा पर्दाफाश कधी होणार असा प्रश्न सर्व सामान्य नागरिक विचारत आहेत. कलाकेंद्र परिसर व बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर व्यवसाय सुरू आहे. अशी चर्चा सुरू आहे.

आष्टी तील राधिका लॉज चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आष्टी शहरातील काही लॉजवर वेश्याव्यवसाय सुरु असल्याची चर्चा मागिल काही दिवसांपासून सुरू होती.

लाँजवरील वेश्याव्यवसायाबाबत आष्टी पोलिसांना माहिती मिळताच नगर जामखेड मार्गावरील व तहसिल कार्यालयासमोर असणाऱ्या राधिका लॉजवर डमी ग्राहक पाठवून खात्री केली. गुरुवारी (ता.२४) रात्री ९.३० च्या सुमारास पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेत छापा टाकला असता लॉजचालक लहू सानप (रा. कासेवाडी, ता आष्टी) हा सांगली तसेच कर्नाटक राज्यातील महिला आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय चालवताना आढळून आला.

यावेळी येथील दोन पिडीत महिलांची पोलिसांनी
सुटका केली आहे. याप्रकरणी लहु सानप याच्यावर
आष्टी पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक
विजय देशमुख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल
करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस हे करत आहेत. सदरील कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, सहायक पोलिस निरीक्षक विजय देशमुख,भाऊसाहेब गोसावी, पोलीस कॉन्स्टेबल सचिन पवळ, पोलीस शिपाई एम एस शेख, दादासाहेब भगत आदींनी केली.

चौकट
जामखेड परिसरातही लाँजवर मोठ्या प्रमाणात वेश्याव्यवसाय राजरोसपणे चालत आहे. याचा पर्दाफाश कधी होणार असा प्रश्न सर्व सामान्य नागरिक विचारत आहेत. कलाकेंद्र परिसरात व बसस्थानक परिसरात राजरोसपणे मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरू आहे. अशी चर्चा सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here