भारती श्रमजीवी पत्रकार संघाच्या वतीने कलम के योद्धा पुरस्काराने पत्रकार अविनाश कदम सन्मानित

0
132

जामखेड न्युज——

भारती श्रमजीवी पत्रकार संघाच्या वतीने कलम के योद्धा पुरस्काराने पत्रकार अविनाश कदम सन्मानित

 

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयीजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, भारती श्रमजीवी पत्रकार संघाच्या वतीने दिल्ली कॉन्स्टिट्युशन क्लब ऑफ इंडिया येथे कलम के योद्धा पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा दै.लोकमतचे तालुका प्रतिनिधी अविनाश कदम यांच्या पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असल्याची दखल घेऊन कलम के योद्धा पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.

दिल्ली येथे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, भारती श्रमजीवी पत्रकार संघाच्या वतीने दिल्ली कॉन्स्टिट्युशन क्लब ऑफ इंडिया येथे कलम के योद्धा पुरस्काराचे आयोजन दि.२५ आॅगस्ट रोजी करण्यात आले होते.ज्यामध्ये विविध राज्यातील पत्रकारांना कलम के योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


या पुरस्कारात दै.लोकमतचे आष्टी तालुका प्रतिनिधी तथा आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम यांनी मागिल १६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना कलम के योद्धा पुरस्काराने सन्माचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले याप्रसंगी केसी यादव यांनी पत्रकारांना संबोधित करताना अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.


यावेळी भारती वर्किंग जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय सिंघ,रेखा सिंघ,दिल्ली एन.सीआरचे अध्यक्ष राकेश सिंघ, दिल्ली पोलिस विशेष आयुक्त संजय सिंघ, डॉ.भरत झा, ओ. बी.सी. आयोगाचे अध्यक्ष जगदीश यादव,प्राध्यापक ए.के.साईनी, डीन इंद्रप्रस्थ विद्यालय सुरभी दहिया, इंग्रजी पत्रकारिता, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन,आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ भरत झा,अनुप चावला यांनी सर्व पुरस्कारार्थी पत्रकार यांचे अभिनंदन केले.तर पत्रकार अविनाश कदम यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here