एकाच दिवशी सहा ठिकाणी घरफोडी मुळे एकच खळबळ खर्डा येथे चोरट्यांच्या मारहाणीत एक जण गंभीर जखमी खर्ड्यात रात्री तर राजुरी, धानोरा, अरणगाव, पारेवाडी व कोल्हेवस्ती येथे दिवसा घरफोडी

0
178

 

 

जामखेड न्युज——

एकाच दिवशी सहा ठिकाणी घरफोडी मुळे एकच खळबळ खर्डा येथे चोरट्यांच्या मारहाणीत एक जण गंभीर जखमी

खर्ड्यात रात्री तर राजुरी, धानोरा, अरणगाव, पारेवाडी व कोल्हेवस्ती येथे दिवसा घरफोडी

जामखेड तालुक्यातील विविध ठिकाणी चोरट्यांचा सुळसुळाट सुरू झाला आहे. खर्डा येथे रात्री चोरीची घटना घडली असून मुरलीधर गहीनीनाथ गोलेकर यांना जबर जखमी केले आहे. तर आज दिवसभर राजुरी, धानोरा, अरणगाव, पारेवाडी व कोल्हेवस्ती येथे दिवसा घरफोडी झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

जामखेड तालुक्यातील खर्डा शहरालगत जामखेड रोडवर असलेल्या गोलेकर लवण येथील मुरलीधर गहीनीनाथ गोलेकर (वय ५७) यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या स्वयंपाक खोलीचा दरवाजा तोडून घराच्या हॉलमध्ये झोपलेले असताना चार अज्ञात चोरट्यानी मुरलीधर गोलेकर यांचेवर हल्ला करत घरातील रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने असा दोन लाख पाच हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. या हल्ल्यात फिर्यादी हे गंभीर जखमी झाले असून त्यांचेवर जामखेड येथिल खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार अज्ञात चोरट्यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीच्या घटनेमुळे खर्डा परिसरात खळबळ उडाली असून खर्डा पोलीस चोरट्यांचा कसून तपास करीत असून, चोरांना पकडायचे पोलीसांपुढे मोठे आव्हान आहे.


या बाबत सविस्तर असे की, दि २७ आॅगस्ट रोजी रात्री दोन वाजताचे सुमारास खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील व खर्डा शहरापासून काही अंतरावर असलेल्या जामखेड रोडवरील गोलेकर लवण येथील मुरलीधर गोलेकर हे त्यांचे राहते घराच्या हॉलमध्ये झोपलेले असताना चार अज्ञात चोरट्यानी घराचे मागील किचनचा दरवाजा कशानेतरी तोडुन घरामध्ये प्रवेश करून फिर्यादी यांना लोखंडी जाड गजाने दोन्ही हातावर, डावे पायाचे मांडीवर व डावे बरगडीवर मारहाण करून फिर्यादी यांची पत्नी यांच्या तोंडावर रग टाकुन दाबुन धरले व त्यापैकी एकाने फिर्यादी यांनी आरडाओरडा करू नको असे म्हणाला असता फिर्यादीस मारहाण केल्यामुळे त्यांनी आरडा ओरड केल्याने त्याच्या हातातील चाकुने फिर्यादी यांच्या डाव्या गालावर मारून जखमी केले. त्यावेळी फिर्यादी यांच्या घरा शेजारी राहणारे त्यांचे भाऊ शत्रुघन व भावजई मनिषा हे उठले व त्यांनी आरडा ओरड केल्यामुळे सर्व अज्ञात चोरटे ९०००० रूपये किमतीचे तीन तोळे सोन्याचे गंठण, ३६०००रूपये किमतीचे १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठन, १०००० रूपये किंमतीचे सुट्टे मणी व अर्धा ग्रॅम वजनाची एक नथ ६८००० रु. रोख रक्कम, असा एकुण २०४८०० रूपयांचा मुद्देमाल घेऊन किचनमधिल पाठीमागील दरवाजा मधुन पळून गेले आहेत वगैरे मजकुरचे फिर्यादीवरून अज्ञात चार चोरट्यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून खर्डा पोलीस घटनेचा कसून तपास करीत आहेत.

अहमदनगरचे अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे व कर्जत उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांनी भेटी दिल्या असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली
या घटनेचा पुढील तपास खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर हे करत आहेत.

आज दुपारी राजुरी, धानोरा, अरणगांव, पारेवाडी व कोल्हेवस्ती येथे घरफोड्या झाल्या आहेत. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here