जामखेड न्युज——
शिवनेरी अकॅडमीच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा व खेळांविषयी मार्गदर्शन
शिवनेरी अकॅडमीच्या वतीने कॅप्टन लक्ष्मण भोरे
मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद बांधखडक शाळेत
विद्यार्थ्यांच्या १०० व ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धा, लांब उडी, वर्टीकल रोप, पुल अप्स अशा विविध स्पर्धा सर्व प्रात्यक्षिकासह घेण्यात आल्या. यामध्ये मुलांमध्ये प्रथम तीन क्रमांक व मुलींमधे प्रथम तीन क्रमांकास बक्षीस देण्यात आले. त्याचप्रमाणे सैन्यमध्ये विद्यार्थी कसा घडतो शिस्त कशी असावी आचार-विचार, व्यायाम व वेळेचे महत्व, याबद्दल अकॅडमीच्या वतीने कॅप्टन लक्ष्मण भोरे यांनी मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्याबरोबर आलेले शाळेचे मुख्याध्यापक
व त्यांच्याबरोबर आदर्श गुरुवर्य ह. भ. प. श्री.मनोहर इनामदार यांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी इनामदार सरांनी शिवनेरी अकॅडमीतील बहादूर विद्यार्थ्यांना सुंदर असे मार्गदर्शन व सैनिकाचे महत्त्व,व देशप्रेम याबद्दल मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीसाठी मुलांना शुभेच्छा दिल्या. मोठ्या उत्साहात संपन्न झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कॅप्टन लक्ष्मण भोरे यांनी केले.

जामखेड येथिल शिवनेरी अकॅडमीच्या माध्यमातून तालुक्यातील बांधखडक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घेत त्यांना खेळांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

शिवनेरी अकॅडमीचे वैशिष्ट्ये
सर्वच दलाकरिता योग्य मार्गदर्शन..
तज्ञ वा अनुभवी शिक्षक भरती क्षेत्रातील आठ वर्षांचा अनुभव.

प्रत्येक शनिवारी शारीरिक व लेखी परीक्षा पूर्ण तयारी
निवास व भोजनाची उत्तम सोय व मिनरल वॉटर सुविधा
माजी सैनिक व एनसीसी विद्यार्थ्यांना विशेष सवलत
व्यक्तिमत्व विकासावर विशेष भर व वैयक्तिक लक्ष.







