जामखेड न्युज——

ए.सी. कोठारी फर्मचे संस्थापक चंदुलाल कोठारी यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी वृध्दपकाळाने निधन झाले
जामखेड येथील उद्योगपती तथा जामखेड जैन श्रावक संघाचे ट्रस्टी , दि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे माजी संचालक,तसेच जामखेड येथील आरोळे हॉस्पिटल ला सात एकर जमीन दान देण्यात सिंहाचा वाटा असलेले चंदुलाल कोठारी यांचे आज शुक्रवार दिनांक २५/८/२०२३ रोजी पहाटे ४:३० वाजता दुःखद निधन झाले त्यांच्यामागे स्वर्गवासी रसिक कोठारी,जामखेड श्रावक संघाचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी, अमृत कोठारी कॉन्ट्रॅक्टर अनिल कोठारी तसेच बेबी सुभाषलाल सोनीमंडलेचा चा यांचे ते पिताश्री आहेत.
जामखेड येथे सुरुवातीला कॉन्ट्रॅक्टर कामे केली सामाजिक कामात ते सतत अग्रेसर असत साधुसंतांची सेवा करत होते देशात नावाजलेले आरोळे हॉस्पिटल यांना १९७० सात एकर जागा दान करण्यात सर्वात अग्रेसर होते अशी माहिती सामाजिक कार्यकरते संजय कोठारी यांनी दिली.
आत्ताच दोन महिन्यापूर्वी त्यांचे मोठा मुलगा रसिकलाल कोठारी यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या मागे३ मुले ,सुना ,१मुलगी नातवंडे असा परिवार आहे.