जामखेड न्युज——
सकल जैन समाजाच्या वतीने जामखेड मध्ये राष्ट्रसंत आनंदऋषी महाराज यांची जन्म जयंती उत्साहात साजरी
पं. पु. राष्ट्रसंत आनंदऋषी महाराज यांच्या १२३ व्या जन्म जयंती निमित्त जामखेड शहरात सकल जैन समाजाच्या वतीने भव्य मिरवणूक तसेच
गुरू महाराजांवरील गितांचा संगीत भजन संध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी आमदार रोहित पवार यांची खास उपस्थिती होती.
जयंतीनिमित्त जामखेड शहरात सकल जैन समाजाच्या वतीने जयंतीचे आयोजन करण्यात आले होते दुपारी तीन वाजता जामखेड शहरतुन महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत सकल जैन समाजातील महिला पुरूष व लहान मुलांनी मोठा सहभाग नोंदविला होता प. पु. आनंदऋषी महाराज यांनी दिलेली शिकवण व समाजासाठी केलेले प्रबोधन या संदर्भातील संदेश समाजाला कळावा अशा स्वरूपाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
या मिरवणुकीचा समारोप महावीर भवन याठिकाणी झाला यावेळी गुरू महाराजांवरील गितांचा संगीत भजन संध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या जयंती उत्सवासाठी आमदार रोहित पवार यांनी हजेरी लावत उपस्थितांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या या वेळी बोलताना आ. रोहित पवार म्हणाले की पं. पु. आनंदऋषी महाराज यांनी जगाला शांततेचा संदेश दिला आहे तसेच महापुरुषांची जयंती साजरी करण्याच्या पाठीमागे एक प्रेरणा आसते ती साजरी करताना अध्यात्मिक धार्मिक मिरवणूक काढावी तसेच आपल्या गुरूंचे विचार अजरामर रहावेत व पुढची पिढी प्रेरीत व्हावी आणि यासाठीचे संस्कार हे बाल वयातच झाले पाहिजेत हे संस्कार जीवनात आपल्या यशाचे शिखर गाठण्यासाठी बळ देत आसतात.
गुरू होणं हे सोपं कार्य नाही त्यासाठी त्याग संघर्ष व तपस्या करावी लागते त्याच वेळी एखादी व्यक्ती गुरुपदा पर्यंत पोहचती असे सांगितले. सकल जैन समाज बांधवांच्या वतीने आ. पवार यांचा उद्योजक आकाश बाफना, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहुल बेदमुथ्था, शरद शिंगवी, अभय शिंगवी, महावीर बाफना, मंगेश बेदमुथा , पिंटूशेठ बोरा, महेश कटारिया, योगेश भंडारी, अशोक बाफना यांनी सन्मान केला यावेळी सामाजिक कार्यकर्ते निलेश भाऊ गायववळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मधुकर राळेभात, सुनील कोठारी, रमेश आजबे, बापु कार्ले,यांच्या सह सकल जैन समाज बांधव व महिला भगिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.