शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेत गोंधळ झाल्यास सत्ताधारी जबाबदार राहणार – सदिच्छाचे जिल्हाध्यक्ष नारायण राऊत शिक्षकांच्या कायम ठेवी तून 20 हजार कपात करण्यास सभासदांचा प्रखर विरोध

0
140

जामखेड न्युज——

शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेत गोंधळ झाल्यास सत्ताधारी जबाबदार राहणार – सदिच्छाचे जिल्हाध्यक्ष नारायण राऊत

शिक्षकांच्या कायम ठेवी तून 20 हजार कपात करण्यास सभासदांचा प्रखर विरोध

 

येत्या 20 ऑगस्ट रोजी शिक्षक बँकेच्या कायम ठेव कपातीवरून गोंधळ झाल्यास त्याला सत्ताधारी जबाबदार राहतील असा इशारा राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष माधव हासे व सदिच्छाचे जिल्हाध्यक्ष नारायण राऊत यांनी दिला आहे.

शिक्षक संघ व सदिच्छा मंडळाच्या वतीने जाहिर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सत्ताधारी मंडळाने वार्षिक सभेत विकास मंडळ या त्रयस्थ संस्थेला शिक्षकांच्या कायम ठेवीतून २० हजार रुपये कपात करण्याचा ठराव घेण्याचा घाट घातला आहे वार्षिक सभेत सभासदांची उपस्थिती 2 हजाराच्या आसपास असते अशा वेळी घरी असणाऱ्या सभासदांची संख्या 8 हजार असते त्यांच्या उपस्थित नसल्याचां गैर फायदा साताधारी घेत आहेत वार्षिक सभेत वैयक्तीक ठेवींना हात घालण्याचा प्रकार म्हणजे एक प्रकारचा अपहारच आहे.

गुरुजी हॉस्पीटला आमचा प्रखर विरोध असून जिल्हा परिषदेच्या शाळा विकसीत करण्याच्या धर्तीवर विकास मंडळाच बांधकाम बांधा वापरा या तत्वावर करायला हवे प्राथमिक शिक्षकोच्या खिशातून एक रुपया जरी वर्ग केला तर याद राखा याच परिणाम सत्ताधारी संचालक मंडळाला भोगावे लागतील नेते त्यांना वाचवू शकत नाही. कायदेशीर लढाई करून संचालकांना जेलची हवा खायला लागेल असा संतप्त इशारा पत्रकात देण्यात आला आहे.

जिल्ह्यातील कोणताही प्राथमिक शिक्षक सभासदाने कायम ठेवीतून एक रुपयाही कपात करून देवू नये. असे आवाहन केले आहे. संगमनेर अकोल्यात कोणत्याही शिक्षक सभासदाला या हॉस्पीटलची गरज नाही केवळ दोन तालुक्यातील ठराविक नेत्यांच्या फायद्यासाठी हॉस्पीटलचा घाट घातल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

नेत्यांच्या डॉक्टर मुलांसाठी गुरुजी हॉस्पीटल गुरुजींच्या पैशातून बांधण्याचा व त्यातून आर्थिक फायदा करून घेण्याचा सत्ताधारी मंडळाचा डाव उधळून लावणार आहे असेही पत्रकात म्हटले आहे.

शिक्षक बँकेत अनेक प्रकारची आर्थिक अनागोंदी चालू असून केवळ सोशल मिडीयातून काही बगलबच्यांना मानधनावर पोस्ट टाकून सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालू आहे असाही आरोप त्यांनी केला कायम ठेव कपातीवरून वार्षिक सभेत गोंधळ झाल्यास सत्ताधारी संचालक मंडळ जबाबदार राहीन असा इशारा शिक्षक नेते राजेद्र शिंदे, रवि पिंपळे, भास्कर कराळे ज्ञानेश्वर माळवे बाबा आव्हाड नवनाथ तोडमल, बबनदादा गाडेकर, विनोद फलके, गहीनीनाथ शिरसाठ, सुरेश खेडकर, पांडुरंग काळे,
राजेश बनकर, चंद्रकांत मोरे, सुनील गिरमे, राजेंद्र कुदनर, संतोष दळे, विनोद सोनवणे, चंद्रकांत मोढवे, दादा वाघ, राजाभाऊ बेहळे, रहीमान शेख आदि कार्यकर्त्यांनी दिला आहे.

चौकट

कायम ठेव कपातीच्या मुद्दयावर सर्व संघटना नेते एकवटले

कायम ठेव कपातीस जिल्हाभरातून सभासदांचा विरोध पाहता सर्व संघटना नेत्यांचा या मुद्यावर समन्वय झाला आहे. त्यामुळे वार्षिक सभेला जिल्हाभरातून. हजारो सभासद उपस्थित राहून विरोध नोंदवणार आहेत. वैयक्तीक ठेवींना हात घालाल तर याद राखा असे म्हणण्याची वेळ आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here