Wednesday, February 11, 2026
Home राजकारण महावीर कनिष्ठ महाविद्यालयास प्रा.सचिन गायवळ यांची सदिच्छा भेट, स्वातंत्र्य दिनानिमित्त स्नेहभोजनाचा आस्वाद

महावीर कनिष्ठ महाविद्यालयास प्रा.सचिन गायवळ यांची सदिच्छा भेट, स्वातंत्र्य दिनानिमित्त स्नेहभोजनाचा आस्वाद

0
168

जामखेड न्युज——

महावीर कनिष्ठ महाविद्यालयास प्रा.सचिन गायवळ यांची सदिच्छा भेट, स्वातंत्र्य दिनानिमित्त स्नेहभोजनाचा आस्वाद

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष यांच्या महावीर कनिष्ठ महाविद्यालयास स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रा सचिन गायवळ यांना खास आमंत्रण होते. ध्वजारोहणानंतर धोंडे व स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला यामुळे जामखेड मध्ये राजकीय भुवया उंचावल्या आहेत.

15 ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात धोंडे व स्नेहभोजनाचा घेतला आस्वाद, जामखेड मध्ये राजकीय भुवया उंचावल्या..

याबाबत माहिती अशी की राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष व ज्येष्ठ नेते मा. राजेंद्रजी कोठारी हे दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी कै. सुभाष कोठारी शैक्षणिक,सामाजिक व क्रीडा विकास संस्था जामखेड संचलित महावीर कनिष्ठ महाविद्यालय व जूनियर कॉलेजमध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम आयोजित करतात त्यानंतर 25 वर्षापासून जामखेड मधील मित्रपरिवार आप्तेष्ट व विविध सामाजिक क्षेत्रातील लोकांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवून स्नेहसंबंध जपण्याचा प्रयत्न करून जातीय व सामाजिक सलोखा राखण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे आमंत्रित सर्वच मान्यवर व जामखेडकर या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद न चुकता घेत असतात. या कार्यक्रमात विशेष निमंत्रित असणारे सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन गायवळ यांना राजेंद्र कोठारी यांनी आग्रहाचे निमंत्रण दिले होते, त्या आमंत्रणाचा स्वीकार करून गायवळ यांनी भेट दिली, यावेळी प्रा.गायवळ यांना कोठारी यांनी प्रेमाने धोंडे खाऊ घातले व स्नेहभोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर त्यांनी महावीर कनिष्ठ महाविद्यालय व ज्युनियर कॉलेजला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.


गायवळ यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक क्षेत्राची गुणवत्ता व क्रीडा विभागाची माहिती घेऊन खेळाडू तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले. परंतु या दोन नेत्यांच्या भेटीने जामखेड तालुक्यातील सर्वपक्षीय राजकीय जाणकारांच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत. मध्यंतरी जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षातील गटबाजी मुळे नाराज झालेल्या प्रा.सचिन गायवळ यांनी भाजपला पाठिंबा दिल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता पसरली होती. राजेंद्र कोठारी हे पूर्वीपासूनच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात राजकीय चानाक्षबुद्धी असणारे कोठारी यांची प्रा.सचिन गायवळ यांच्याबरोबर झालेल्या भेटीने ते राजकीय गळ घालून त्यांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय करतात का हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे?एक मात्र खरे आहे की या नेत्यांच्या भेटीमुळे पुन्हा जामखेडमध्ये तर्क वितर्कला उधान आले आहे.
याप्रसंगी पत्रकार दत्तराज पवार यासीन भाई शेख उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!