Wednesday, February 11, 2026
Home ताज्या बातम्या कडधान्य पोषणाचा खजिना -कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर ल. ना. होशिंग विद्यालयात प्रधानमंत्री...

कडधान्य पोषणाचा खजिना -कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर ल. ना. होशिंग विद्यालयात प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेतंर्गत तृणधान्य जागरूकता कार्यक्रम

0
118

जामखेड न्युज——

कडधान्य पोषणाचा खजिना -कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर

ल. ना. होशिंग विद्यालयात प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेतंर्गत तृणधान्य जागरूकता कार्यक्रम

 

विद्यार्थ्यांनी ज्वारी बाजरी, नाचणी, वरई, राळा, सावा,राजगिरा आदी पिकांच्या कडधान्याची आपल्या आहारामध्ये वापर करावा कडधान्य म्हणजे पोषणाचा खजिना आहे. असे मत कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी सांगितले.

ल.ना.होशिंग विद्यालयामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्य (कडधान्य) जागरूकता निर्माण करण्यात आली


यावेळी तालुका कृषी अधिकारी डॉक्टर सुपेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांना ज्वारी बाजरी,नाचणी,वरई,राळा,कुटुकी,सावा,राजगिरा आदी पिकांच्या कडधान्याची आपल्या आहारामध्ये किती महत्त्व आहे हे मुलांना पटवून दिले.

कास धरा निरोगी आरोग्याची स्वयंपाक घरात गरजू पौष्टिक तृणधान्याची

मी शपथ घेतो की आठवड्यातून किमान एकदा तरी पौष्टिक तृणधान्याच्या पदार्थाचे सहकुटुंब सेवन करीन अशी शपथ विद्यार्थ्याकडून घेतली. तसेच पौष्टिक तृणधान्य विकासाची खालील *सप्तसूत्री* सांगितली.

निर्यात वृद्धी.
उत्पादन व उत्पादकता वाढ.
पोषण मूल्य व आरोग्य विषयक फायदे.
मूल्यवर्धन प्रक्रिया व पाककृती विकास.
धोरणात्मक निर्णयातून अंमलबजावणी.
प्रचार प्रसिद्धीतून जनजागृती निर्माण वाढवणे.
नव उद्योगातून व्यावसायिक दृष्टिकोन वाढवणे.

आपण जर रोजच्या रोज असा कडधान्य युक्त पौष्टिक व सकस आहार सेवन केल्यास आपण कधीही आजारी पडणार नाही विनाकारण आपले बाहेर खर्च होणारे पैसे वाचतील. तसेच विद्यार्थ्यांना कोणत्याही गोष्टीचे मार्गदर्शन हवे असल्यास कधीही कोणत्याही वेळी फोन करून विचारावे असे आवाहन राजेंद्र सुपेकर यांनी केले. शासनाने ही विद्यार्थ्यांना कडधान्याची माहिती मिळवण्यासाठी शाळेमध्ये अशी उपक्रम सुरू केलेले आहेत सध्या आपल्या राज्यात पौष्टिक तृणधान्याचे क्षेत्र कमी होत आहे.या तृणधान्याचे महत्त्व विचारात घेता संयुक्त राष्ट्र संघाने सुद्धा 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे.त्यानिमित्त शाळेमध्ये विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना माहिती देणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्या विषयी जनजागृती वाढेल आणि त्यांच्या आरोग्य सुधारण्यास मदत होईल. तसेच नागरिकांमध्ये पौष्टिक तृणधान्य बद्दल जागरूकता वाढवूण तृणधान्याचे उत्पादन अधिकाधिक उत्पादन वाढवणे यासाठी प्रोत्साहन देणे सुद्धा या मागचा हेतू आहे. विद्यार्थ्यांना शालेय जीवनात तृणधान्याचे ( कडधान्य) व त्यांची पौष्टिकता याचे महत्त्व कळल्यास त्यांचा फायदा त्यांना भविष्यात होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांची बालवयातील जागरूकता समाजमन बदलण्यास फायदेशीर ठरणार आहे. यामुळे तृणधान्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी व त्यांचा दैनंदिन आहारात तृणधान्यांचे (कडधान्यांचे) समावेशाचे फायदे विद्यार्थ्यांना मिळतील.

तसेच यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीकांत होशिंग साहेब यांनी आपल्या शाळेमध्ये आपण परसबाग तयार केली आहे आणि या परसबागेतील पौष्टिक व सेंद्रिय भाजीपाला आपण आपल्या शालेय पोषण आहारात वापरत आहोत.तसेच विद्यार्थ्यांना तृणधान्य (उकडधण्याचे) महत्त्व पटवून दिले. तसेच विद्यार्थ्यांनी स्वतःचे आरोग्याची काळजी घेणे, स्वच्छ गणवेश वापरणे, आजाराला बळी न पडणे, सकस व पौष्टिक आहार घेणे याविषयी योग्य असे मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी उपमुख्याध्यापक बाळासाहेब पारखे, पर्यवेक्षक प्रवीण गायकवाड, समारंभ प्रमुख श्री पोपट जगदाळे,शिक्षक प्रतिनिधी किशोर कुलकर्णी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनसीसी विभाग प्रमुख श्री अनिल देडे सर यांनी केले. आभार श्री प्रवीण गायकवाड (पर्यवेक्षक) सर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!