जामखेड न्युज——

मिशन आपुलकी अंतर्गत जिल्हा परिषद शाळांना लाखो रूपयांची मदत – गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे
मिशन आपुलकी अंतर्गत जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना पालक, ग्रामस्थ व स्वयंसेवी संस्था कडून लाखो रूपयांची मदत करण्यात आली आहे मदत करणाऱ्या सर्वांचे आभार गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी मानले आहेत.
भारतीय स्वातंत्र्य दिन म्हणजे 15 ऑगस्ट जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी शाळेत पालकसभा सभा घेण्यात आली. काही शाळांमध्ये सास्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .. यावेळी ग्रामस्थ , पालक , पदाधिकारी यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती.
यावेळी मिशन आपूलकी अंतर्गत जिल्हा परिषद शाळांना मोठ्या प्रमाणावर मदत मिळाली.
अहिल्यादेवीनगर येथे एकूण 35900 रुपये,
मुंगेवाडी येथे52000 रूपये,
बांगरवस्ती येथे 17500 रुपये,
पिंपरखेड येथे54000 रुपये,
कडभनवाडी येथे 43000 रुपये,
सारोळा येथे 15000 रुपये,
बटेवाडी येथे 8500रुपये,
काटेवाडी येथे 16000 रुपये,
डोळेवाडी येथे 15000 रूपये
असे एकूण 256000 रूपये जमा झाले
यामध्ये काहींनी रोख रक्कम तर काहींनी वस्तू स्वरूपात मदत केली . जामखेड तालुक्यातील इतर अनेक शाळा अशा प्रकारची चांगली मदत झाली आहे .
या सर्व देणगीदारांचे, विद्यार्थी, शिक्षकांचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी आभार मानले आहेत.