जामखेड न्युज——
आरोळे हॉस्पिटलच्या माध्यमातून गरीब व होतकरू विद्यार्थीनींना सायकल वाटप
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त बीड व नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गरीब व होतकरू विद्यार्थीनींना झेप फाऊंडेशन,आरोळे हॉस्पिटल आणि डायनॅमिक विमेन ऑफ मिशिगन च्या वतीने चारशे चार सायकल वाटप करण्यात आले. तालुक्यातील साकत येथे श्री साकेश्वर विद्यालय येथे बारा तर जिल्हा परिषद शाळेत सहा सायकल वाटप करण्यात आले.
बीड व नगर जिल्ह्यातील शाळेतील गरीब होतकरू आई वडील गमावलेल्या मुलींचा शोध घेत चारशे चार सायकल वाटप करण्यात आले यात श्री साकेश्वर विद्यालय साकत येथे बारा मुलींना तर जिल्हा परिषद शाळेत सहा विद्यार्थ्यांनींना सायकल वाटप करण्यात आले. यावेळी त्यांच्या कडून वाहतूक खर्च म्हणून प्रत्येकी तीनशे रुपये घेण्यात आले. व सायकल वाटप करण्यात आले.
झेप फाऊंडेशन, CRHP (आरोळे हॉस्पिटल) आणि डायनॅमिक विमेन ऑफ मिशिगन, अमेरिका यांच्या वतीने बीड आणि अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थीनींना सायकल वाटप या सदराखाली झेंडा वंदन झाल्यानंतर सायकल वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच हनुमंत पाटील, सौ. मनिषा पाटील, उपसरपंच राजाभाऊ वराट, गणेश वराट, नानासाहेब लहाने, हनुमंत वराट, विठ्ठल वराट, महादेव वराट, ज्ञानदेव मुरूमकर, आप्पासाहेब लहाने, रामचंद्र वराट, प्रभु वराट, पोलीस पाटील महादेव वराट, शहादेव वराट, देविदास वराट, निशिकांत वराट, विष्णू लहाने, अशोक मुरूमकर सर, शिवाजी घोडेस्वार, महादेव वराट, आरोग्य रक्षक आशा सानप, निर्मला सानप, तन्वी मुरूमकर, वैष्णवी वराट, मुख्याध्यापक दत्ता काळे, शिवाजी मिसाळ, राजकुमार थोरवे, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, महादेव मत्रे, अर्जुन रासकर, अशोक घोलप, त्रिंबक लोळगे, सचिन वराट, सुलभा लवुळ, विजय हराळे, अतुल दळवी, आण्णा विटकर, आश्रू सरोदे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.