जामखेड न्युज——
सनराईज शैक्षणिक संकुल मध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त माजी सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण

सनराईज शैक्षणिक संकुलात, स्वांतत्र्याचा ७६ वा वर्धापन दिन कार्यक्रम उत्साहात साजरा, माजी सैनिक बजरंग डोके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

जामखेड तालुक्यातील पाडळी फाटा येथील सनराईज शैक्षणिक संकुलाच्या सनराईज इंग्लिश स्कूल, साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय व स्व.एम.ई.भोरे ज्युनिअर कॉलेज मध्ये भारतीय स्वांतत्र्याचा ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. जामखेड तालुका माजी सैनिक संघटनचे तालुका अध्यक्ष माजी सैनिक बजरंग डोके मेजर यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी सनराईज शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष डॉ.संजय भोरे, संस्थेच्या सचिव तथा प्राचार्या श्रीमती जोगदंड मॅडम, तेजस भोरे, जामखेड तालुका माजी सैनिक संघटनेचे सदस्य तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी व विद्यार्थीनी देशभक्ती पर गिते, नृत्य व भाषणे सादर केली.
या कार्यक्रमांचे सूत्रसंचलन प्रा.आयकर सर यांनी केले तर आभार प्रा.मोहिते सर यांनी केले.




