जामखेड न्युज——
आला रे आला बिबट्या आला!! जातेगाव परिसरात वासरावर हल्ला
जामखेड तालुक्यातील जातेगाव घाटात बिबट्या दिसुन आली आसल्याची घटना दोन दिवसांपुर्वीच घडली होती. याच जातेगाव परीसरात जुन्या नांदेश्वर मंदिराच्या शिवारातील एका वस्तीवर काल मध्यरात्री च्या सुमारास एका बिबट्याने सात महीन्याच्या वासरावर हल्ला करून त्या वासराचा फडशा केला आहे. या बाबत ची माहिती जातेगाव येथिल ग्रामस्थांनी दिली आहे. तसेच या ठीकाणी पिंजरा लावून या बिबट्याचा बंदोबस्त करावा आशी मागणी परीसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
जामखेड तालुक्यातील जातेगाव घाटात दि १० ऑगस्ट रोजी मध्यरात्री जातेगावचे सरपंच रविराज गायकवाड, त्यांचे सहकारी सुनील सखाराम गायकवाड यांना बिबट्या रस्त्यावरून जात असताना दिसुन आला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे त्या व्हीडिओ मध्ये एक बिबट्या दिसुन आला आहे.
याबाबत अधिक माहिती आशी की जातेगाव परीसरातील जुन्या नांदेश्वर मंदिराच्या बाजुला आसलेल्या भारत पोपट भोसले यांच्या वस्तीवर काल दि १४ ऑगस्ट रोजी रात्री झोपलेले आसताना मध्यरात्री च्या सुमारास एका बिबट्याने वस्तीवर प्रवेश केला. या ठीकाणी भोसले यांच्या गोठ्यात बांधलेल्या सात महीन्याच्या वासरावर या बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात वासराचा जागीच मृत्यू झाला. त्या मुळे परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
———————-
मागिल वर्षी वनविभागाने पिंजरे लावले होते. परंतु, एकही बिबट्या पिंजऱ्यात अडकला नव्हता. आता दोन तीन दिवसांपासून जातेगाव परीसरात बिबट्याची दहशत पसरत आहे. काल बिबट्याच्या हल्ल्यात एका वासराचा मृत्यू झाला आहे. त्यामूळे वनविभागाने पिंजरा लावून तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा.
(पोपट गायकवाड, माजी सरपंच जातेगाव)
———————-
जातेगाव परिसरात दोन दिवसा पुर्वी बिबट्या दिसुन आला आसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. पुन्हा रात्री एका वासरावर हल्ला केला यात वासराचा मृत्यू झाला असुन याबाबत आम्ही आमचे कर्मचारी घटनास्थळी पाठवले आहेत. नेमका हल्ला कोणी केला याचा तपास सुरू आहे. बिबट्याने हल्ला केला आसेल तर परीसरात पिंजरे लावण्यात येतील
(मोहन शेळके
वनपरिक्षेत्र अधिकारी, कर्जात-जामखेड)
———————-